Pandharpur Warkari Dead in Accident by Travels : पंढरपूरच्या (Pandharpur ) विठ्ठलाची आषाढी वारी दोन दिवसावर येऊन ठेपल्याने वारकऱ्यांची लगबग सध्या दिसत आहे. मात्र अशाच एका वारकऱ्याबद्दल (Warkari) धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंढरपूर जवळील टेंभुर्णी रस्त्यावर एका ट्रॅव्हल्सने (Accident by Travels ) धडक दिल्याने एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. टेंभुर्णीच्या करकंब जवळ आज पहाटे 3 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ कशी राबविणार? जाणून घ्या ए टू झेड माहिती
बाबुराव धोंडीबा जावळे असं या 60 वर्षीय वारकऱ्याचं नाव असून ते अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कौठा या गावातील राहीवासी आहेत. विठ्ठल दर्शनाच्या दिशेने निघालेल्या या वारकऱ्यावर काळाने घातल्याने दिंडीतील सर्वच वारकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. तर त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच पायी दिंडीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जरांगे नावाच्या भुताला बाटलीत बंद करा अन् अरबी समुद्रात…; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
तसेच या अपघातानंतर वारकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला होता. सध्या राज्यभरातून विठ्ठल भक्त विविध दिंड्यांच्या माध्यमातून पायी पंढरपूरकडे रवाना होत असताना पोलीस आणि आरटीओकडून वाहनांना शिस्त लावण्याची गरज असल्याचं त्या वारकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवलं. दरम्यान या अपघातानंतर या मृत वारकऱ्याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ कशी राबविणार?
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी यांनी पावसाळी अधिवेशनात या योजनेची घोषणा केली होती. दरम्यान, आता या योजनेचा शासन निर्णय निर्णय सरकारने जारी केला असून त्यात या योजनेबाबतचे सर्व तपशील दिले आहेत. गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांचे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना भेटी देणं सुकर व्हावं यासाठी सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक किंवा जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना मोफत तीर्थक्षेत्रांना भेटी देता याव्यात यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केल्याचं या शासन निर्णयात म्हटलं आहे.