जरांगे नावाच्या भुताला बाटलीत बंद करा अन् अरबी समुद्रात…; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Laxman Hake on Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (OBC reservation) देण्याची मागणी मनोज जरागेंनी केली. त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांकडून विरोध होत आहे. आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने मनोज जरांगेंकडून (Manoj Jarange) सातत्याने सरकारवर टीका केली जाते. आता त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसण्याचा इशारा दिला. या सर्व पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ लढा देणारे लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) जरांगेंवर जोरदार टीका केली.
भुजबळांनी मुद्दा छेडला अन् भाषण संपताच मराठा आरक्षणासाठी बारामतीत जोरदार घोषणा
मनोज जरांगे नावाच्या भूताला बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून द्या, असे वादग्रस्त लक्ष्मण हाके यांनी केले आहे
लक्ष्मण हाकेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाबाबत शून्य समज आहे. राज्यात अराजकता निर्माण करणं हेच त्यांचं ध्येय आहे. आरक्षणासाठी मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या, त्याला जरांगे पाटीलच जबाबदार आहेत. जरांगे पाटील हे महाराष्ट्राला काळीमा आहेत, अशी टीका हाकेंनी केली.
सल्ले देऊन महाराष्ट्र पेटविण्याचे उद्योग चालविले जातायत; भुजबळांचा शरद पवारांवर गंभीर आरोप
जी गोष्ट कधीच मिळणार नाही, जी गोष्ट संविधानाला, कायद्याला अपेक्षित नाही, ती गोष्ट मिळवून देतो ही कसली भाषा आहे. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार… ते शिव्या घालतात. अर्वाच्य भाषेत बोलतात. अरे, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगता आणि सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करता. कोणत्या कलमांचं भंग होत नाही का? मुख्यमंत्री, गृहमंत्री, तुम्ही शिव्या खात आहात. हा तुमच्या एकट्याचा नाही तर 12 कोटी जनतेचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांना शिव्या घालत असतील तर तो आमचा अपमान नाही का? असा सवाल हाकेंनी केली.
मुख्यमंत्र्यांनी वेळीच या भूताला आवर घातला पाहिजे. हे भूत एका बाटलीत बंद करावं आणि कुठेतरी अरबी समुद्रात फेकून द्यावं, असं विधान करत या महाराष्ट्राने कधीही ओबीसी-मराठा संघर्ष पाहिला नाही, असंही हाके म्हणाले.
जरांगेंचं 20 जुलैपासून उपोषण
13 तारखेपर्यंत अल्टिमेटम देऊनही मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही, आता ते कसे मिळवायचे आम्ही पाहतो. मी पुन्हा येत्या 20 जुलैपासून बेमुदत उपोषण करणार आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी राज्यातील 288 मतदारसंघांत उमेदवार उभे करायचे की पाडायचे हे ठरवू, असा इशारा जरांगेंनी दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी देवेंद्र फडणवीस इतर मंत्र्यांवर दबाव आणत असतील, असा आरोप जरांगेंनी केला.