भुजबळांनी मुद्दा छेडला अन् भाषण संपताच मराठा आरक्षणासाठी बारामतीत जोरदार घोषणा
Announcement for Maratha Reservation during Chhagan Bhujbal Speech : मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज बारामतीमध्ये भाषणामध्ये शरद पवारांवर टीका करत आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा छेडला. त्यावेळी त्यांचे भाषण संपताच उपस्थितांमधून एक मराठा लाख मराठा असं म्हणत मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. ते राष्ट्रवादीच्या जनसामान्य मेळाव्यात बोलत होते.
पाठीमागून सल्ले देऊन महाराष्ट्र पेटविण्याचे उद्योग चालविले जातायत; भुजबळांचा शरद पवारांवर गंभीर आरोप
यावेळी भुजबळ म्हणाले की, लाडकी बहीण योजनेसाठी सुनेत्रा पवार यांना मतदान करणाऱ्या तसेच सुप्रिया सुळे यांना मतदान करणाऱ्या देखील सर्व बहिणींचे अर्ज भरण्यात यावेत. यामध्ये भेदभाव केला जाऊ नये. आरक्षणाचा प्रश्न राज्यभर गाजतोय मात्र काही लोक यामध्ये आपापसात लढाया करण्याचं काम करताय. मराठ्यांना आरक्षण मिळावे ही आमची देखील भूमिका आहे. मात्र त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणावर अन्याय होऊ नये हे भांडण मिटवावं.
विरोधकांना तोंड दाखवायला जागा…; लाडकी बहिण योजनेवरून होत असलेल्या टीकेला तटकरेंचं प्रत्युत्तर
यासाठी सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांची बैठक बोलावली होती मात्र त्या बैठकीला विरोधकांनी दांडी मारले. मात्र या बैठकीला स्वतः शरद पवार देखील उपस्थित राहिले नाही. असं म्हणत छगन भुजबळ यांनी यावेळी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं. तसेच छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणामध्ये आरक्षणाचा मुद्दा छेडला. त्यामुळे त्यांचे भाषण संपताच उपस्थितांमधून एक मराठा लाख मराठा असं म्हणत मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
छगन भुजबळ म्हणाले, मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला मी जितेंद्र आव्हाड यांना बोलविले होते. त्यांना मी कायद्याच्या काही कॉपी दिल्या. त्यांना सांगितले की काही झाले तरी शरद पवार यांना बैठकीला बोलवून घ्या. व्ही. पी. सिंग यांनी दिलेले आरक्षण हे शरद पवारांनी लागू केले म्हणून आम्ही त्यांचा जयजयकार केला. त्यांचे आभारही मानले. आरक्षणासारखे प्रश्न जेव्हा निर्माण होतात. तेव्हा जेष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी तिथे यायला पाहिजे होते. असे सांगितले जाते सर्व येणार होते. पण पाच वाजता बारामतीतून कुणाचा तरी फोन गेला आणि बैठकीला येणारे विरोधीपक्षांच्या नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.