सल्ले देऊन महाराष्ट्र पेटविण्याचे उद्योग चालविले जातायत; भुजबळांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

  • Written By: Published:
सल्ले देऊन महाराष्ट्र पेटविण्याचे उद्योग चालविले जातायत; भुजबळांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

Chhagan Bhujbal On Sharad Pawar : बारामतीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीकडून जनसन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीवरून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. तसेच एक गंभीर आरोपही केला आहे. (ncp leader Chhagan Bhujbal serious allegations against Sharad Pawar over martaha reservation)


हौसे-नवशे-गवश्यांना भुलू नका माझा वादा पक्का असतो; अजितदादांचं भर पावसात बारामतीकरांना आवाहन

छगन भुजबळ म्हणाले, मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला मी जितेंद्र आव्हाड यांना बोलविले होते. त्यांना मी कायद्याच्या काही कॉपी दिल्या. त्यांना सांगितले की काही झाले तरी शरद पवार यांना बैठकीला बोलवून घ्या. व्ही. पी. सिंग यांनी दिलेले आरक्षण हे शरद पवारांनी लागू केले म्हणून आम्ही त्यांचा जय जयकार केला. त्यांचे आभारही मानले. आरक्षणासारखे प्रश्न जेव्हा निर्माण होतात. तेव्हा जेष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी तिथे यायला पाहिजे होते. असे सांगितले जाते सर्व येणार होते. पण पाच वाजता बारामतीतून कुणाचा तरी फोन गेला आणि बैठकीला येणारे विरोधीपक्षांच्या नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.


‘मी फुटलेलो नाही, आधी माझी बदनामी थांबवा’ आमदार खोसकरांचा संताप

तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजित पवार यांच्यावर असेल. तुमचा राग छगन भुजबळांवर असेल. पण ओबीसी समाजाने तुमचे काय घोडे मारले आहे. का तुम्ही येत नाही ? का हे सगळे मिटविण्यासाठी, तुम्ही आमच्याबरोबर येत नाही. सगळ्यांना सांगायचे आहे. मग पाठीमागून काही तरी सल्ले द्यायचे, त्यातून महाराष्ट्र पेटविण्याचे उद्योग चालविले जात आहे, असा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.

छगन भुजबळ यांचे भाषण झाल्यानंतर मात्र सभेतील काही जणांनी एक मराठा, लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एका अर्थाने सभेतील लोकांना छगन भुजबळ यांना थेट विरोध दर्शविला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube