मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्याल तर सरकारला सत्तेतून खेचू; प्रकाश शेंडगेंचा इशारा

  • Written By: Published:
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्याल तर सरकारला सत्तेतून खेचू; प्रकाश शेंडगेंचा इशारा

Prakash Shendge : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. त्यांनी सरकाराला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली. मात्र, जरागेंच्या या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध होत आहे. जरांगेंनी राज्यात सभा घ्यायला सुरूवात केल्यानं आणि ते ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असल्यानं जरांगेंविरोधात ओबीसी समाज एकटवला आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह सर्वच ओबीसी नेत्यांनी या मागणीला विरोध केला. दरम्यान, आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनीही जरांगेच्या मागणीवरून सरकारला इशारा दिला.

Anjali Damania : ‘त्या’ कुटुंबाचं घर भुजबळांनी हडपलं, 48 तासात पैसे द्या अन्यथा.. दमानियांचा इशारा 

प्रकाश शेंडगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, जरांगे ओबीसीतून आरक्षण मागत आहेत, त्याला आमचा विरोध आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले द्यायला आमचा कायम विरोध असेल. सरकारने तसा जीआर काढून ओबींसींच्या आरक्षणाला धक्का लावला ला तर आम्ही कोर्टात जाऊ, तसचं आगामी निवडणुकीत सरकारला खाली खेचू, तेवढी ताकद आमच्यात आहे, असा इशारा दिला.

Maratha Reservation : ‘त्या’ पापाचे प्रायश्चित भोगावेच लागेल! मंत्री विखेंचा ‘मविआ’वर घणाघात 

प्रकाश शेंडगे म्हणाले की, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा होता. मात्र, सरकारने दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं नाही. मराठा समाजाला हे ५० टक्क्यांच्या वर वेगळं आरक्षण करून द्या. आता मराठा समाजाची जी आंदोलन सुरू आहेत, ती ओबीसी समाजावर अन्याय करणारी आहेत. मराठा समाजाने आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांऐवजी 65 टक्के करण्यासाठी आंदोलन करावे. त्यासाठी आम्हीही तुमच्यासोबत राहू. पण, तुम्ही ओबीसीतून आरक्षण मागताय, हे चुकीचं आहे.

संभाजी राजेंनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला, पण मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केलेली नाही. त्यामुळं सामाजिक अन्याय त्यांच्याकडून झाला नाही. ते गादीचे वारसदार आहेत. विचारांचा वारसा अद्याप त्यांनी साोडला नाही. मराठा नेते भुजबळांवर टीका करत असताना संभाजीराजांनी बोलणे गरजेचे होते. ओबीसी नेत्याने परखड भूमिका मांडली असेल तर त्यावर संभाजीराजेंनी वाईट वाटून घेऊ नये, असं आवाहन शेंडगे यांनी केलं. दरम्यान, बीडच्या दंगलीत कुणी कुणाचे घर जाळले, दगडफेक केली हे राज्यानं पाहिलं. भुजबळांनी असं कोणतंही प्रक्षोभक विधान केलेले नाही. याउलट जे हिंसक आंदोलन होतंय ते मराठा समाजाकडून झालं आहे. मराठा आंदोलनाच्या माध्यमातून दहशत निर्माण केली जाते, असा आरोप शेंडगे यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube