Anjali Damania : ‘त्या’ कुटुंबाचं घर भुजबळांनी हडपलं, 48 तासात पैसे द्या अन्यथा.. दमानियांचा इशारा

Anjali Damania : ‘त्या’ कुटुंबाचं घर भुजबळांनी हडपलं, 48 तासात पैसे द्या अन्यथा.. दमानियांचा इशारा

Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. मुबंईतील सांताक्रुझ पश्चिम येथील छगन भुजबळांची इमारत ही फर्नांडिस कुटुंबाच्या जागेवर बांधली असून या कुटुंबाला एकही पैसा भुजबळांनी दिलेला नाही. फर्नांडिस कुटुंब अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे मात्र भुजबळांकडून त्यांना दाद मिळत नाही. आता जर 48 तासात कुटुंबाला पैसे मिळाले नाही तर भुजबळांच्या घरासमोर आंदोलन करू, असा इशारा दमानिया यांनी पीडित कुटुंबासह पत्रकार परिषद घेत दिला. दरम्यान, अंजली दमानिया यांनी केलेले आरोप छगन भुजबळ यांनी फेटाळून लावले आहेत. आम्ही कुणाचेही घर लाटले नाही. याबाबत कोर्टात केस चालू आहे. कोर्ट जो निकाल देईल तो आम्हाला मान्य राहिल, असे भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal : ‘ओबीसींना बाहेर ढकलण्याचा डाव’; छगन भुजबळांचा गंभीर आरोप

दमानिया पुढे म्हणाल्या, मी छगन भुजबळांचं भाषण ऐकलं. माझ्या डोक्यात तिडीक गेली. तळपायाची आग मस्तकात गेली. काल ते म्हणाले, की आम्ही आमच्या कष्टाचं खातोय. तर ते कुठल्या कष्टाचं खात आहेत त्याचा खुलासा करण्यासाठीच आज मी मीडियाला त्यांचं घर दाखवलं. हे घर त्यांचं नाही तर फर्नांडिस परिवाराचं लुटलेलं घर आहे. 1994 मध्ये फर्नांडिस कुटुंबाचा एक बंगला होता. तो बंगला पुनर्विकासासाठी देण्यात आला. या बंगल्याच्या मोबदल्यात पाच फ्लॅट या कुंटुंबाला मिळणार होते. परंतु, ते काही मिळाले नाहीत.

बंगल्याचा जो प्लॉट होता तो समीर भुजबळ यांच्या बांधकाम कंपनीला विकण्यात आला. बंगला पाडण्यात आल्यानंतर संबंधित कुटुंब हजारदा समीर भुजबळांना भेटले तरीही या कुटुंबाला एक रुपयाही मिळाला नाही. फर्नांडिस कुटुंबाचा बंगला पाडून मोठी इमारत बांधली. परंतु, या कुटुंबाला आजही पैसे मिळालेले नाहीत, असा आरोप करत 48 तासांत फर्नांडिस कुटुंबाला पैसे द्यावेत, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला.

Chagan Bhujbal : कुणबी प्रमाणपत्र देणारे सत्तेतून जातील; भुजबळांच्या विधानाने खळबळ

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या ?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी भाष्य केले. येत्या 48 तासात पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तीन मुलं आणि विधवा आई यांच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे. त्यामुळं राजकारण बाजूला ठेऊन संवेदनशीलपणे याकजे पाहिले पाहिजे. अंजली दमानिया यांनी अत्यंत संवेदनशीलपणे हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुढील 48 तासांत या कुटुंबाला न्याय मिळेल,अशी अपेक्षा करू या, असे सुळे म्हणाल्या.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube