Pankaja Mundes Pa Anant Garje Wife Gauri Suiside father cried for Not suicide, but murder : राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नीने शनिवारी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गौरीच्या कुटुंबीयांनी आमच्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी गौरी पालवे गर्जे यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर येथील मोहोज देवढे या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी पालवे यांच्या नातेवाईकांनी अनंत गर्जे यांच्या घरासमोरच आपल्या मुलीवर अग्निसंस्कार व्हावेत, असा आग्रह धरला. यावरुन गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. यानंतर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच डॉ. गौरी पालवे यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. यानंतर सध्या गावात तणावाचे वातावरण आहे. याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त असून सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.
सुरुवातीला गौरी पालवे यांच्या नातेवाईकांना अनंत गर्जे यांना अटक झाल्याची माहिती नव्हती. त्यामुळे पालवे यांच्या नातेवाईकांना डॉ. गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना अनंत गर्जे यांना अटक झाल्याची माहिती देत त्यांची समजूत काढली. त्यानंतर गौरी पालवे गर्जे यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. दरम्यान, रविवारी रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली होती. अनंत गर्जे याच्यासह त्याचा भाऊ आणि बहिणीवर डॉ. गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत गर्जे यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत होऊ शकते. काहीवेळापूर्वीच पोलिसांचे एक पथक अनंत गर्जे यांच्या वरळीतील घरी रवाना झाले आहे.
गौरीच्या वडिलांनी फोडला टाहो…
डॉ.गौरी पालवे यांच पार्थिव मोहोज देवढे गावात दाखल झाले. त्यावेळी माहेरच्या मंडळींनी पती अनंत गर्जे यांच्या घरासमोर अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली यावेळी मोहोज देवढे गावात तणावपूर्ण वातावरण होतं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली.अनंत गर्जे याला अंत्यविधीसाठी घेऊन येण्याची पालवे कुटुंबांची मागणी आहे. अनंत गर्जे याच्या घरासमोरच डॉक्टर गौरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक आक्रमक झाले आहेत. डॉक्टर गौरी यांनी गर्जे याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. पाथर्डी पोलीस मोहोज देवडे गावात तळ ठोकून आहेत. नातेवाईकांची समजूत घालण्याचा पोलीस प्रशासनचा प्रयत्न आहे.
यावेळी गौरीच्या वडिलांनी टाहो फोडल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले तिला गर्जे कुटुंब त्रास देत होतं. तसेच तिने आत्महत्या केली नाही तर तिची हत्या करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही मुलीच्या वडिलांनी श्रीमंत मुलाला मुली देऊ नये. तसेच अनंतला खरच अटक केली आहे. त्याला व्हिडीओ कॉलवर दाखवण्याची मागणी यावेळी गौरीच्या वडिलांनी केली.
नेमकं प्रकरणं काय?
राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे (Gauri Palve) यांचा 7 फ्रब्रुवाारी रोजी लग्न झाला होता. डॉक्टर गौरीने राहत्या घरी शनिवार 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता घरात गळाफास घेऊन आत्महत्या केली. तर डॉक्टर गौरी यांचा सासरच्या मंडळींकडून छळ करण्यात येत होता असा आरोप गौरी यांच्या कुटुंबियांनी केला आहे.
मनाच्या अत्यंत जवळची गोष्ट… वाढदिवसानिमित्त अमृताची खास पोस्ट,पण चाहत्यांना पडला वेगळाच प्रश्न
दरम्यान या प्रकरणात वरळी पोलिसांनी (Worli Police) अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याच दरम्यान आता या प्रकरणामध्ये पती अनंत गर्जे याला पोलिसांनी अटक केली आहे. रात्री एक वाजेच्या सुमारास गर्जे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. यामध्ये अनंत गर्जेस त्याची बहिण शितल आणि भाऊ अजय विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंत्री पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी माध्यमांसाठी प्रेस नोट काढली आहे. त्यात त्या म्हणतात, 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6.30 ते 6.45 वाजण्याच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता . पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी ही खूप धक्कादायक होती, अशी भावना पंकजा मुंडे यांची आहे.
