Pavana Dam : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत धरणात ५५.०७% उपयुक्त पाणीसाठा नोंदविण्यात आला असून, धरणात ४.६८ टीएमसी (१३२.७२ एमएम³) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या २४ तासांत धरण परिसरात ४२६ मिमी मुसळधार पावसाची नोंद झाली असून, आजची पाण्याची आवक ४३.५४ एमएम³ इतकी झाली आहे.
पवना धरणाची सद्यस्थिती (६ जुलै २०२६, सकाळी ६:००)
जलपातळी : ६०७.७७ मीटर
एकूण पाणीसाठा : १६३.८६ एमएम³ (५.७८ टीएमसी)
उपयुक्त पाणीसाठा : १३२.७२ एमएम³ (४.६८ टीएमसी)
पाणीसाठा : ५५.०७%
२४ तासांतील पाऊस : ४२६ मिमी
१ जूनपासून एकूण पाऊस : १२०८ मिमी
आजची पाण्याची आवक : ४३.५४ एमएम³
सध्या सांडव्यावरून किंवा कालव्याद्वारे कोणताही विसर्ग सुरू नाही.
राज्यात आज धो धो पाऊस; ‘या’ सहा जिल्ह्यांतील शाळा – महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मागील वर्षी याच दिवशी धरणात ७७.२८% (६.५७ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा पाणीसाठा झपाट्याने वाढत असला तरी तो अद्याप मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे.
