Pawanraje Nimbalkar murder case why Anna Hazare’s testimony and Parasmal Jain approver : गेल्या 20 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकालावर सुनावणी सुरू आहे. मात्र या प्रकरणामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची साक्ष का घेतली गेली? त्याचबरोबर आरोपी असलेले पारसमल जैन माफीचा साक्षीदार कसा ठरला? जाणून घ्या सविस्तर…
अण्णा हजारेंची साक्ष का?
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात 2019 साली कोर्टने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची साक्ष घेण्याचे आदेश दिले होते. त्याअगोदर 2009 मध्येच सीबीआयने या प्रकरणात हजारेंचा जबाब देखील नोंदवला होता. मात्र तोंडी साक्ष देखील घेतली गेली. याच कारण होतं ते अण्णा हजारे यांनी पद्मसिंह पाटल मंत्री असताना 2005 मध्ये झालेल्या तेरणा स्ट्रस्ट सह तेरणा कारखाना साखर घोटाळा त्याचबरोबर कारगील निधी यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. तसा अहवाल सावंत आयोगाने देखील दिल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
पवनराजे हत्याकांड : या प्रकरणाचा पायाच ठिसूळ, न्यायालयाचे मोठं निरीक्षण
अण्णा हजारेंच्या या आरोपांनंतर याच भ्रष्टाचाराच्या आरोपांतूनच पवनराजेंचा खून झाल्याच्या चर्चा देखील झाल्या. याला कारण होतं ते म्हणजे या प्रकरणातम माफीचा साक्षीदार झालेल्या पारसमल जैन याचा जबाब. जैनने म्हटलं होतं की, पवनराजेंसोबत पद्मसिंह पाटलांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या अण्णा हजारेंची देखील मला 30 लाखांची सुपारी देण्यात आली होती. ही सुपारी पद्मसिंह पाटलांनी सतीश मंदाडे मार्फत देण्यात आली होती.
पारसमल जैन माफीचा साक्षीदार कसा ठरला?
तसेच या प्रकरणाचा खुलासा करणारा 9 आरोपींपैकी एक असलेला पारसमल जैन या प्रकरणामध्ये माफीचा साक्षीदार बनला आहे कारण त्याने सीबीआयच्या कोर्टात सर्व माहिती मांडणे आणि सत्य सांगणे या अटीवर माफीचा साक्षीदार बनला होता. त्यासाठी त्याने सीबीाय कोर्टत अर्ज दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने त्याला मंजूरी दिली.
