Download App

उसाच्या बिलाचे पैसे द्या, अन्यथा…. सदाभाऊ खोतांचा पाटलांना इशारा

  • Written By: Last Updated:

मागीलवर्षीच्या शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलाचे पैसे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या साखरकारखान्याने दिले नसल्याने शेतकरी नेते सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहे. 30 जून पर्यंत जर उसाच्या बिलाचे पैसे दिले नाही तर हर्षवर्धन पाटील यांच्या साखरकारखान्यावर 1 जुलैपासून रयतक्रांती संघटना आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी सदाभाऊ खोत यांनी दिला. ते पत्रकारांशी बोलत होते. (Pay the sugarcane bill, or else… sadabhau khot on harshavardhan patil )

यावेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले… हे शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे आहेत. अद्याप पर्यंत कारखान्याने ते पैसे दिले नाहीत ते पैसे शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे. कारण आता शेतकऱ्यांचा पेरणी हंगाम सुरु झाला आहे. त्यासाठी आता खते – बियाणे शेतकऱ्यांना घायची आहेत. त्यासाठी त्याला पैशाची गरज आहे. त्यामुळे लवकरात लवकर उसाच्या बिलाचे पैसे द्यावेत अन्यथा 1 जुलैला साखरकारखान्यात धरणे आंदोलन केले जाईल. त्यावरही कारखान्याने पैसे नाही दिले तर पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाईल असं सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

सुषमा अंधारेंमुळे मी पक्ष सोडला, पक्ष प्रवेशानंतर आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या…

राज्यामध्ये ही परिस्थिती सर्वत्र आहे. साखरकारखान्यांनी शेतकऱ्यांचं ऊस नेहला मात्र अद्याप पर्यंत त्यांच्या उसाच्या बिलाचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी आथिर्क अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पोराला आणि शेतकऱ्याला आम्ही जागा करू कारण शेतकऱ्याच्या घामाचे पैसे आहेत. असे देखील यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले.

Tags

follow us