सुषमा अंधारेंमुळे मी पक्ष सोडला, पक्ष प्रवेशानंतर आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या…

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 06 18 At 11.11.09 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार प्रा. मनीषा कायंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रेवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना मनीषा कायंदे म्हणाल्या… यावेळी बोलतांना कायंदे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना अधिकृत आणि ओरिजनल शिवसेना आहे. इमाने-इतबारे मी मागच्या शिवसेनेत काम केलं. पक्षाची भूमिका मी भक्कमपणे मांडली. परंतु मागच्या वर्षभरात काहीही ऐकूण घेतलं जात नव्हतं.

देवी-देवतांचा अपमान करणाऱ्यांचं आणि देवी बसली, असं म्हणून देवीचा अवमान करणाऱ्यांचं आता टीव्हीवर ऐकावं लागत आहे. ठाकरेंची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना नव्हे, खरी शिवसेना इथे आहे असं कायंदे म्हणाल्या. यावेळी बोलताना त्यांनी सुषमा अंधारवर थेट टीका केली. (I left the party because of Sushma Andharan, MLA Manisha Kayande said after joining the party…)

दरम्यान, सकाळपासून त्या शिंदेंच्या शिवसेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या सर्व घाडामोडींवर मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, शिवसेनेत प्रवेश करताच त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. आता यापुढे शिवसेनेत काम करत राहणार असल्याचंही मनीषा कायंदे यांनी पक्ष प्रवेशानंतर सांगितलं.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी कांयदे यांच्याकडून व्यक्त केली.

मुंबईतील चुनाभट्टी भागातील माजी नगरसेवक विजय तांडेल आणि त्याची पत्नी सानवी विजय तांडेल यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्याना पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांनी पक्षात स्वागत केले. तसेच त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकिय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह चुनाभट्टी भागातील असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

 

Tags

follow us