Download App

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोकाट तरुणांची टोळी; शाळा-महाविद्यालयांबाहेर पोलिसांनी दिला चोप

शाळा-महाविद्यालयांसह मोकळ्या मैदानांमध्ये, कट्ट्यांवर बसून सिगारेट, दारू पिणाऱ्यांवर देखील पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.

  • Written By: Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळा-महाविद्यालयांबाहेर थांबून मुलींना त्रास देणाऱ्या, धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. (Sambhajinagar) पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार पाच अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने सोमवारपासून शहरातील विविध ठिकाणी बडक कारवाया सुरू झाल्या आहेत. टवाळखोरांना लाठीचा प्रसाद देऊन पिटाळून लावण्यात आलं.

शाळा-महाविद्यालयांसह मोकळ्या मैदानांमध्ये, कट्ट्यांवर बसून सिगारेट, दारू पिणाऱ्यांवर देखील पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील महाविद्यालये, शाळा परिसर असुरक्षित बनल्याचे चित्र आहे. भांडणं, हाणामारी तसंच मुलींचा पाठलाग, अश्लील शेरेबाजीचे प्रकार वाढले आहेत.

..त्यावेळी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता; प्रियंका गांधींचा गृहमंत्री अमित शहांच्या दाव्यांवर थेट पलटवार

मुकुंदवाडी भागात काही दिवसांपूर्वी नागरिकांनी लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. तसंच, सरस्वती भुवन महाविद्यालयाबाहेर देखील काही दिवसांपूर्वी घडलेला टवाळखोरांनी राडा केला होता. यानंतर महाविद्यालयाच्या प्राचायाँनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर आयुक्त प्रवीण पवार यांनी शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा त्रास सहन केला जाणार नाही, असं स्पष्ट करत सहायक निरीक्षक शिवाजी चौरे, उपनिरीक्षक संदीप काळे, अर्जुन कदम, अभिजित चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाला कडक कारवाईच्या सूचना केल्या.

या पथकाने सोमवारी दुपारी देवगिरी महाविद्यालय, एस.बी. परिसरात जाऊन टवाळखोरांना बेट लाठ्यांचा प्रसाद देत पिटाळून लावलं, अचानक पोलिसांच्या कारवाईमुळे टवाळखाेरांची पळता भुई थोडी झाली. नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केलं आहे. सातत्याने अशा कारवाया झाल्या तर टवाळ खोरांची महाविद्यालये, शाळेजवळ फिरकण्याची हिम्मत होणार नाही.

follow us