Download App

पोलिस निरीक्षकाकडून लग्नाचं अन् तरूणीशी शारीरिक संबंध; अहिल्यानगरमधील धक्कादायक प्रकार

Police inspector ने अहिल्यानगरमध्ये तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

  • Written By: Last Updated:

Police inspector Physical relations with girl by bait of marriage in Ahilyanagar : अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिस ठाणे हे सर्वांत संवेदशनील भागातील आणि महत्वाचे पोलिस ठाणे आहे. या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी रोखणे आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कायम राखण्यासाठी पोलिसांना सतत कार्यरत रहावे लागले. असे असले तरी या पोलिस ठाण्यातील नियुक्ती ही प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे ही मलईदार नियुक्ती मिळविण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा असते.

अखेर शनिशिंगणापूरचे विश्वस्त मंडळ बरखास्त! बनावट ॲप्स, आर्थिक गैरव्यवहारांनंतर कारवाई…

मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या पोलिस ठाण्यात नियुक्त झालेले अधिकारी काही ना काही वादात अडकले आहेत. केवळ भ्रष्टाचार नव्हे तर महिलांवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. मुख्य म्हणजे या पोलिस ठाण्याचा इतिहास पाहिला तर अगदी बोटावर मोजण्याएवढेच अधिकारी आपला कार्यकाळ कोणताही डाग न लागता पूर्ण करून गेले आहेत.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम कायम!

बाकीचे कुठल्या ना कुठल्या वादात अडकून येथून गेले आहेत. येथे येताना कडक शिस्तीचे म्हणून ओळख असलेले अधिकारीही वादात अडकून, बदनाम होऊन येथून गेले आहेत. अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला आहे. अद्यापही अनेक जण येथे असताना दाखल झालेले खटले सोसत आहेत. अलीकडेच या पोलिस ठाण्यात बदलून आलेले आणि कडक शिस्तीचे म्हणून ओखळले जाणारे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे हेही आता अशाच प्रकरणात अडकले आहेत.

मोदींच्या 75 व्या वाढदिवशी पुण्यात अनोखा उपक्रम,”मिशन निर्मल” स्वच्छता अभियानचा शुभारंभ!

आजच त्यांच्याविरूद्ध एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून शिवीगाळ, दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.तोफखाना पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मूळची हुबळी, पश्चिम बंगाल आणि आता मुंबईत राहायला असलेल्या ३० वर्षीय तरुणीने ही फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमेरिका किंवा इस्त्राइलच्या हल्ल्यांना कडक प्रत्युत्तर देऊ; इराणची अमेरिकेला थेट धमकी

फिर्यादीत म्हटले आहे की, दराडे यांनी ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत या तरुणाीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. पालघर येथील फार्म हाऊस व तरुणीच्या घरातही असे कृत्य केले. अलीकडे दराडे यांनी तरुणीवर दबाव आणून तिला झाले गेले विसरून जाण्यास बजावले. सोडून जावे म्हणून धमकी दिली. तरुणीने पोलिसांत तक्रार करते, असे सांगितले असते काय करायचे ते कर असे सांगितले. त्यामुळे तरुणीने नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दराडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोतवालीच्या वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या यादीत एकाची भर पडली.

follow us