Gadchiroli : गडचिरोली पोलिसांकडून तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान, महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला कारवाई

Police killed Naxalist in Gadchiroli : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली या नक्षलग्रस्त भागामध्ये पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. रविवारी 30 एप्रिलच्या संध्याकाळी गडचिरोली जिल्ह्यातील मन्नेराजाराम परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली यामध्ये पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. या कारवाईमध्ये कंठस्नान घालण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये पेरीमली दलमचा कमांडर बेटलू मडावीचाही समावेश आहे. त्याशिवाय इतर दोन नक्षलवादीही […]

Untitled Design   2023 05 01T075503.144

gadchiroli police

Police killed Naxalist in Gadchiroli : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली या नक्षलग्रस्त भागामध्ये पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. रविवारी 30 एप्रिलच्या संध्याकाळी गडचिरोली जिल्ह्यातील मन्नेराजाराम परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली यामध्ये पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.

या कारवाईमध्ये कंठस्नान घालण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये पेरीमली दलमचा कमांडर बेटलू मडावीचाही समावेश आहे. त्याशिवाय इतर दोन नक्षलवादीही मारल्याची माहिती मिळाली आहे.

Shinde VS Thackery : ‘वज्रमूठ’ सभेपुर्वी शिवसेनेचा ठाकरे गटाला आणखी एक धक्का, ‘या’ खासदाराचे निकटवर्तीय शिवसेनेत

विशेष म्हणजे मारला गेलेला नक्षली कमांडर बेटलू मडावी हा मार्च महिन्यात पोलीस भरतीमध्ये मारण्यात आलेल्या साईनाथ नरोटे या तरूणाच्या हत्येचा मुख्य सुत्रधार आहे.

दरम्यान सध्या ही चकमक थांबली आहे. सध्या चकमक झालेल्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु असून चकमक थांबली आहे. या चकमकीमध्ये गडचिरोली पोलिसांना कुठलेही नुकसान झालेले नाही.

Exit mobile version