Download App

चक्क सॅटेलाइटद्वारेच EVM चा ताबा, यामागे मोठे षडयंत्र; चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक आरोप

गडचिरोली – ईव्हीएम (EVM) मशीन हॅक केल्या जातात.  या मशीन हॅक करणे खूप सोपे आहे. मशीन हॅक करूनच भाजप (BJP) निवडणुका जिंकत असल्याचा आरोप विरोधकांकडून नेहमीच केला जातो. त्यामुळे निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणीही त्याबरोबरीने केली जाते. मात्र, आता ठाकरे गटाच्या माजी खासदाराने ईव्हीएम मशीन या सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जात असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.

‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) राज्यात येऊन येथील लोकसभेच्या सर्व 48 जागा जिंकण्याचा दावा करतात. ते कोणत्या आधारावर असा दावा करतात. यामागे नक्कीच काहीतरी षडयंत्र आहे. देशात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन या सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जातात. त्यामुळेच अमित शहा हे असे खात्रीशीर दावे करत आहेत,’ असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला. निवडणुका या बॅलेट पेपरवरच घेतल्या पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यभरात शिवगर्जना यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार ठाकरे गटाचे आमदार-खासदार जिल्ह्याजिल्ह्यात शिवगर्जना यात्रा काढत आहेत. या यात्रेदरम्यान माजी खासदार खैरे गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी येथे भाजप सरकारवर घणाघाती टीका केली.

वाचा : Amit Shah : मोदींच्या नावाने मते मागितली, सत्ता मिळाल्यावर पवारांच्या पायात जाऊन पडले ! 

ते पुढे म्हणाले, की ‘आगामी निवडणुका या बॅलेट पेपरवरच घ्याव्यात अशी आमची मागणी राहणार आहे. अमित शहा हे महाराष्ट्रातील 48 आणि बिहारमधील 36 जागा जिंकण्याचा दावा करतात. इतका खात्रीशीर दावा ते कशाच्या आधारावर करत आहेत ?,’ असा सवाल त्यांनी केला. खरं तर मतदानासाठी ज्या मशीन वापरल्या जात आहेत त्या मशीन सॅटेलाइटद्वारे मॅन्युप्युलेट केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ईव्हीएम मशीन नको आम्हाला बॅलेट पेपरच हवा, अशी मागणी करणार असल्याचे खैरे यांनी सांगितले.

अमित शहा पुण्यात येताच, ठाकरे आणि शिंदे गटात तुफान राडा; परिसरात तणावाचे वातावरण

खैरे यांनी शिंदे गटावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, की शिवसेना फोडण्याचे काम मिंधे गटाने केले. फडणवीसांनी (Devendra Fadanvis) त्यांना स्ट्राँग केले. राज्याचा विकास नाही, रोजगार नाही, महागाई सुद्धा वाढली आहे. हेच सांगण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत, असे खैरे यावेळी म्हणाले.

 

Tags

follow us