Video : ठाकरे गटातील बंडखोर खासदारांचा शिंदेसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
खऱ्या शिवसेनेमध्ये जी बाळासाहेबांची आणि धर्मवीर आनंद दिघे यांची आहे त्यामध्ये कट्टर शिवसैनिक दाखल झाले आहेत त्यांच मी स्वागत करतो
एक नाही माझ्यासोबतच्या बैठकीला सहा टायगर उपस्थिती आहेत. यामध्येही ट्रीपल संजय आहेत. त्यामुळं बाकी संजयबद्दल बोलण्याची गरज नाही असं म्हणत आजच्या बंडखोर खासदारांच्या पक्षप्रवेशाची सुरुवात शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शिवसेना हा एक परिवार आहे. खऱ्या शिवसेनेमध्ये जी बाळासाहेबांची आणि धर्मवीर आनंद दिघे यांची आहे त्यामध्ये कट्टर शिवसैनिक दाखल झाले आहेत त्यांच मी स्वागत करतो असं म्हणत शिंदे यांनी सर्व खासादारंना शिवसेनेत प्रवेश दिला.
मिंधेंनी बाळंत होत सहा गद्दारांना जन्म दिला; संजय राऊतांची शिंदे अन् फुटलेल्या खासदारांवर जहरी टीका
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
‘शिवसेना हे कुटुंब आहे. परिवार आहे. खऱ्या शिवसेना परिवारात, बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेना परिवारात कट्टर शिवसैनिक खासदार सामील झालं आहेत. त्यांचं मी पक्षात स्वागत करतो. चार वर्षापूर्वी 22 जून 2022 रोजी शिवसेनेने आम्ही उठाव केला होता. तेव्हा 40 आमदार सुरुवातीला आले. त्यानंतर पुन्हा चौकार नाही, षटकार मारलेला आहे. सिक्सर अगोदर आपण 2022 साली शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी धनुष्यबाण वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी तो उठाव केला. हा दुसरा टप्पा सुरू झाला आहे असंही ते म्हणाले.
त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या खऱ्या शिवसेनेत तुम्ही आला आहात. मी तुमचं सगळ्या खऱ्या शिवसैनिकांचं स्वागत करतो. हे सर्वजण मतदारसंघाच्या विकासाठी आमच्यासोबत आलेत. शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या विकासाला प्राधान्य देतो. आम्ही अर्धवट ऑपरेशन करत नाही, ऑपरेशन पूर्ण झालं आहे. तुमच्या सगळ्यांना आमच्यासोबत आल्याचा पश्चाताप होणार नाही. सर्वांचा योग्य तो सन्मान आमच्या सर्व लोकांकडून होईल. लोकांच्या सेवेसाठी मी तुमच्या कायम पाठिशी आहे असंही शिंदे यावेळी म्हणाले.
शिंदे यांची थेट घोषणा
आज आमच्यासोबत आलेले सगळे खासदार येणाऱ्या लोकसभेला शिवसेनेचे उमेदवार असतील. धनुष्यबान चिन्हावर ते निवडणूक लढवतील आणि निवडूनही येतील असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत. त्याचबरोबर आपण त्यांच्या पाठिशी आहोत असंही ते म्हणाले.