Download App

पूजा खेडकर पुन्हा चर्चेत, आता ‘त्या’ प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली तक्रार

Pooja Khedkar : पुन्हा एकदा वादग्रस्त प्रोबेशनारी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) चर्चेत आल्या आहेत. माहितीनुसार आता पूजा खेडकर यांनी

  • Written By: Last Updated:

Pooja Khedkar : पुन्हा एकदा वादग्रस्त प्रोबेशनारी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) चर्चेत आल्या आहेत. माहितीनुसार आता पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase) यांच्या विरोधात राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. सुहास दिवसे यांनी उच्च समितीकडे पाठवलेला अहवाल खोटा असल्याची तक्रार त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे तसेच त्यांनी या तक्रारीत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळ केल्याचा आरोप देखील केला आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने मोठी कारवाई करत पूजा खेडकर यांना आयएएस सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला होता. तर दुसरीकडे UPSC ने 31 जुलै 2022 च्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी अर्जात चुकीची माहिती दिल्याचे कारण देत पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केली होती. तर सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी पूजा खेडकर यांनी चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि अपंग कोट्याचा लाभ घेऊन फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे वाशीम पोलिसांकडे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी लैंगिक छळ केल्याची तक्रार पूजा खेडकर यांनी केली होती. पुणे जिल्ह्याधिकारी कार्यालयात प्रशिक्षण कालावधीत सुहास दिवसे यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप पूजा खेडकर यांनी केला होता. त्यांनी या तक्रारीत सुहास दिवसे यांनी लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. मात्र या प्रकरणाच्या तपासासाठी पूजा खेडकर यांना तीनदा समन्स बजावले होते मात्र पूजा खेडकर हजर राहिल्या नाही.

गोळीबार प्रकरणात गोविंदाच्या अडचणी वाढणार, मुंबई पोलीस पुन्हा समन्स पाठवणार?

पूजा खेडकर यांच्यावर कार्यालयात राजेशाही वागण्यापासून ते बोगस अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचे विविध आरोप त्यांच्यावर आहेत. पुण्यात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजु झालेल्या पूजा खेडकर यांना युपीएससी परिक्षेत 821 वी रँक मिळाली होती. त्यानंतरही त्यांना आयएएस केडर मिळाले होते. यासाठी त्यांनी बोगस अपंगत्व प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोपत्यांच्यावर करण्यात आला आहे.

follow us