‘बाप तो बाप ही रहेगा’ गाण्यांवर थिरकले पूजा खेडकरचे वडील, Video व्हायरल
Dilip Khedkar Dance Video : खोटी प्रमाणपत्र सादर केल्यामुळं केंद्र सरकारनं (Central Government) भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ केलेल्या पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे वडील आता चर्चेत आले. दिलीप खेडकरांनी (Dilip Khedkar) हे ‘मैं हु डॉन’, ‘बाप तो बाप ही रहेगा’ या दोन गाण्यांवर चांगलाच ठेका धरल्याचं दिसून आलं. त्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर झाडली गोळी
“डॉन को तो ग्यारह मुल्कों की पुलिस ढूंढ रही है।” Sacked trainee IAS #PujaKhedkar’s father #DilipKhedkar dances to the tune of ‘Main Hoon Don’ and “बाप तो बाप रहेगा” during Ganesh Visarjan 2024! Interesting, isn’t it? What would you call it? #IAS #Don #Dance #UPSC #DoPT pic.twitter.com/hJ835RJzTO
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) September 23, 2024
बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी गणेशोत्सवात बेफान डान्स केला. हा व्हिडिओ अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेलं भालगाव या खेडकर यांच्या मूळ गावाताील आहे. तेथे गणेशोत्सव साजरा करण्यात आला. पाच दिवसीय गणेशोत्सवात दिलीप खेडकर यांनी धम्माल डान्स केला. ‘बाप तो बाप रहेगा’ आणि ‘मै हूं डॉन’ या दोन गाण्यांवर त्यांनी डान्स केला. गणेश उत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत खेडकर यांच्या डान्सचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मोठी बातमी! लेबनॉनवर इस्रायलचा मोठा हवाई हल्ला, 100 जणांचा मृत्यू
दरम्यान, दिलीप, मनोरमा आणि पूजा खेडकर यांच्यावर गुन्हे दाखल आहे. तसेच पूजा खेडकर यांच्या जामिनावार दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पूजा खेडकरला केंद्रीय कार्मिक मंत्रालय आणि यूपीएससीने बडतर्फ केले आहे.
कोण आहेत दिलीप खेडकर?
पूजा खेडकर प्रकरणात त्यांचे वडील दिलीप खेडकर यांच्यावरही गंभीर आरोप आहेत. दिलीप खेडकर हे माजी सनदी अधिकारी आहेत. त्यांचे बीई (मेकॅनिकल) शिक्षण झाले असून त्यांनी राज्य सरकारमध्ये सनदी अधिकारी म्हणून अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
दिलीप खेडकर यांनी निवृत्त होताच वंचित बहुजन आघाडीकडून अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना 13 हजार 749 मते मिळाली होती.