मोठी बातमी! लेबनॉनवर इस्रायलचा मोठा हवाई हल्ला, 100 जणांचा मृत्यू
Israel Airstrikes On Lebanon : पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटनंतर इस्रायलने पुन्हा एकदा लेबनॉनवर मोठा हवाई हल्ला केला आहे. यात 100 जणांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल 300 लोक जखमी झाले आहे. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
माहितीनुसार, सोमवारी लेबनॉनवर इस्रायलने 150 हवाई हल्ले केले ज्यामध्ये मोठ्या संख्येने हिजबुल्लाच्या ठिकाणांना टार्गेट करण्यात आले होते. ऑक्टोबर 2023 पासून इस्रायलचे हमास आणि हिजबुल्लासोबत युद्ध सुरु आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहे.
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, सोमवारी इस्रायली सैन्याने दक्षिणेकडील गावे आणि शहरांवर हवाई हल्ले केले आहे. या हल्ल्यांमध्ये तेथील 100 नागरिक मारले गेले तर 300 जण जखमी झाले आहेत. या लोकांमध्ये लहान मुले, महिला आणि कामगारांचा समावेश आहे अशी माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सध्या हा प्राथमिक आकडा असून मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. लेबनॉनच्या दक्षिण भागाव्यतिरिक्त ईशान्य भागालाही इस्रायलने टार्गेट केले आहे.