Download App

“पोरांनी धुंदी उतरवली!” बुद्धीचे ‘गोपीचंद’ छाप पीक काढणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांचे काय? सामनाच्या अग्रलेखातून खरमरीत टीका

  • Written By: Last Updated:

मुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोगाच्या निकालाची नशा चढली. ते व त्यांचे चाळीस लोक त्याच धुंदीत आहेत, पण बुद्धीचे ‘गोपीचंद’ छाप पीक काढणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांचे काय? त्यांना महाराष्ट्रातील हे अधःपतन दिसते की नाही? की ‘सब घोडे बारा टके’ या न्यायानेच सगळे चालले आहे? चालायचेच. चालू द्या. किती काळ चालवायचे ते पाहूच!” अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून आज सरकारवर करण्यात आली आहे.

“पोरांनी धुंदी उतरवली!” या हेडिंगखाली आज सामनामध्ये अग्रलेख प्रकाशित केला आहे. त्यामध्ये राज्य सरकारसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर सडकून टीका केली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसापासून स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमातील बदलाविरोधात विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. त्या पार्श्वभूमीवर आजच्या अग्रलेखातून सरकारवर टीका करण्यात आली

हेही वाचा : Aurangabad : फतेहनगर, औरंगाबाद ते छत्रपती संभाजीनगर, नामांतराचा इतिहास, मागणी किती जुनी आहे?

हा विद्यार्थी चळवळीचा विजय

राज्यातील ‘एमपीएससी’ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. चार दिवस हजारो विद्यार्थी पुण्यासह इतरत्र रस्त्यांवर होते. हे आंदोलन आता मागे घेण्यात आले आहे. राज्य लोकसेवा आयोगाचा नवा सुधारित अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती 2023 ऐवजी 2025 पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी मान्य करावी लागली. हा विद्यार्थी चळवळीचा विजय आहे. या आंदोलनात भारतीय जनता पक्षाची विद्यार्थी परिषद वगळून इतर सगळेच सहभागी झाले

एकनाथ शिंदेच्या चुकीवर टीका

दोन दिवसापूर्वी माध्यमांशी बोलताना चुकून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची फाईल मी निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं होत, त्यावरही अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने निर्माण केलेल्या मिंधे सेनेचा अशा रचनात्मक कार्याशी काडीमात्र संबंध नसल्याने त्यांच्यापैकी कोणीच या आंदोलनाकडे ढुंकूनही पाहिले नाही. मुळात विषय खोक्यांशी संबंधित नसल्याने त्यांना आंदोलनाची धग समजली नाही. त्याचे प्रात्यक्षिक मुख्यमंत्री शिंदे यांनीच दाखवून दिले. निवडणूक आयोगाने त्यांच्या बाजूने दिलेल्या निकालामुळे मिंधे गटातील शेळय़ा-मेंढय़ा इतक्या हुरळून गेल्या की विचारता सोय नाही.

पत्रकारांनी आपले बुद्धिमान तसेच क्रांतिकारी मुख्यमंत्री श्रीमान शिंदे यांना विचारले की, ‘‘साहेब, एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचा प्रश्न कसा सोडवणार.’’ यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘चिंता करू नका. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची फाईल मी निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. त्यांचा प्रश्न सुटेल!’’

गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका

पुण्यातील आंदोलनात श्री. शरद पवार पोहोचले व त्यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला. वरिष्ठ पातळीवर हालचाली केल्या, लगेच बैठका घेतल्या हे महत्त्वाचे. अशा वेळी भाजपचे ‘गोपीचंद जासूस’ कोणत्या बिळात बसून असतात? एस. टी. कामगार रस्त्यावर उतरले होते तेव्हा

येऊ द्या. तुमच्या सरकारी विलीनीकरणाचा प्रश्न सोडवतोच,’’ असे सांगणारे सर्वच ‘गोपीचंद’ सत्ता येताच फरारी झाले की त्यांनी हे सर्व प्रश्न निकालासाठी निवडणूक आयोगाकडे पाठवले? कारण 2000 कोटींच्या पॅकेजमध्ये अनेक प्रश्न सुटू शकतात, पण यात जनतेच्या प्रश्नांना स्थान नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात सगळाच खेळखंडोबा सुरू आहे.

Tags

follow us