Pornographic activities were started under the name of a cafe; Police caught the couple red-handed : अहिल्यानगर शहरामध्ये कॅफेच्या नावाखाली तरूणांना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करुन देणा-या 5 कॅफे चालकांविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये नगर शहरात ठिकठिकाणी कॅफेच्या नावाखाली मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी केबिन उपलब्ध करून देण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहे. वेळोवेळी पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहे मात्र तरीही हा प्रकार सुरूच आहे.
नावाप्रमाणेच विवेक अन् आडनावाप्रमाणे आतून गोड, नांगरे पाटलांची फणसाळकरांसाठी खास पोस्ट
आज 30 एप्रिलला पथकाने कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील 1) नगर कल्याण रोडवरील द परफेक्ट कॅफे 2) सारसनगर ते वाकोडी जाणारे रोडलगत बेलाचाव कॅफे तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील 3) सावेडी गावातील पंपींग स्टेशनजवळील आँरिगेनो कॅफे 4) कोहिनूर मॉलजवळील झेडके कॅफे व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील 5) स्टेट बँक चौक, अहिल्यानगर येथील वननेस कॅफे अशा ठिकाणी पंचासमक्ष जावुन खात्री केली असता तरुण मुल मुली अश्लील चाळे करताना मिळुन आले.
पथकाने वर नमूद कॅफे चालकास कॅफे चालविण्याचा परवाना बाबत विचारपुस करता त्यांनी कॉफी शॉपचा परवाना नसताना कॉफी शॉपचा बोर्ड लावुन कुठलीही कॉफी, पेय अगर खाद्यपदार्थ विक्रीस न ठेवता आतमध्ये मुलामुलींना बसण्यासाठी व अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले.
Pahalgam Terror Attack : सैन्याला PM मोदींकडून फ्री हॅन्ड; पाकिस्तान अन् चीनला धास्ती…
पथकाने कॅफे चालक नामे 1) महेश पोपट खराडे, वय 23, रा.नालेगाव, अहिल्यानगर (परफेक्ट कॅफे) 2) आसिफ आयाज शेख, वय 26, रा.भोसले आखाडा, बुरूडगाव, अहिल्यानगर 3) विशाल विष्णु वाघ, वय 18, रा.बुरूडगाव रोड, अहिल्यानगर 4) मंगेश भरत आजबे, वय 19, रा.बुरूडगाव रोड, अहिल्यानगर 5) महेश शंकर दरंदले, रा.चिपाडेमळा, अहिल्यानगर फरार (बेलाचाव कॅफे) 6) अविनाश विलास ताठे, वय 32, रा. ताठेनगर, सावेडी, अहिल्यानगर (ऑरिगेनो कॅफे)
एकनिष्ठचे फळ! मुंबई पोलीस आयुक्त पदी देवेन भारती
7) मंगेश रमेश देठे, वय 19, रा. भगवती कोल्हार,ता.राहाता, जि.अहिल्यानगर 8) महेश सातपुते, रा.अहिल्यानगर फरार (झेडके कॅफे)9) कृष्णा अनिल कराळे, वय 19, रा.तपोवन रोड, ज्ञानसंपदा शाळेच्या पाठीमागे, अहिल्यानगर (वननेस कॅफे) यांचेविरूध्द कारवाई करुन कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पथकाने वर नमुद कॅफेमध्ये मिळुन आलेल्या तरुण मुला मुलींना समज देऊन सोडून देण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हे करत आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.