Positive discussions with Chief Minister, many pending issues will be resolved soon : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या चर्चा थंडावल्या असतांना आज मनसेचे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. त्यामुळं चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, राज ठाकरे यांनी या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याविषयी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंनी सांगितलं की, आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाली. त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा झाली. ही सगळी चर्चा सकारात्मक झाली. त्यामुळे अनेक प्रश्न लवकरच सुटतील. वरळी बीडीडी चाळ या संदर्भातला विषय मुख्यमंत्र्यांचा पुढे मांडण्यात आला. या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासावर चर्चा झाली. तिथं नेमकं काय होणार आहे, हे तिथल्या लोकांना काही माहितीच नाही. किती स्क्वेअर फुटांची घरं होणार, हा परिसर मोठा असून, या ठिकाणी रुग्णालय होणार आहे का, शाळा-मैदान होणार आहे का, याबाबत काहीच कल्पना चाळीतील लोकांना नाही. त्यामुळं संबंधित अधिकारी आले होते, ते लवकरच त्या लोकांसमोर प्रेझेन्टेशन करून माहिती देणार आहेत.
आमदार संग्राम जगतापांनी स्थानिक राजकीय मंडळींनाही सोडलं नाही…
ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांशी सिडको संदर्भातही चर्चा झाली. सिडको गृहनिर्माण लॉटरीमधील 22 लाखाचे घर 35 लाखावर गेले आहे. ते परत 22 लाखाला कसे करता येईल, यावर बोलणं झालं. उद्या एक सिडकोच्या अधिकाऱ्यांची बैठक होईल, आणि मार्ग निघेल.
पोलिसांच्या घरांच्या संदर्भातही उद्या बैठक होणार आहे. कलेक्टर लाईनच्या शासकीय घरांबाबतही बैठकीत चर्चा झाली. तिथं अनेक इमारती जुन्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळं त्या इमारतीचा तात्काळ पुनर्विकास कसा करता येईल, याबाबत चर्चा झाली असून त्याविषयी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पॉलिसी करती. एकूण सगळ्या बाबत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालाच पाहिजे, असं मी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावला होता. पण, तो आजपासून बंद होईल, मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत, अशी माहितीही राज ठाकरेंनी दिली.
मराठी शाळांचा तो विषय आलेला आहे, तो मुख्यमंत्र्यांना देखील माहित नव्हता. सरकारकडून असा कोणत्याही प्रकारचा आदेश आलेला नाही. त्यामुळं मराठी विषय बंद होणार नाही, अशा प्रकारचे मुख्यमंत्र्यांनी माझ्या समोर सांगितलेले आह. दादर फुल मार्केट येथे बसत असणाऱ्या कोळी भगिनींना यापुढे पुढची जागा कलेक्टर यांना सांगून क्राफिड मार्केट येथे देण्यात येत आहे, असं ठाकरेंनी सांगितलं.