Download App

प्रज्ञा सातव हल्ला प्रकरण : हिंगोली पोलिसांनी सांगितलं हल्ल्याचं कारण, म्हणाले…

  • Written By: Last Updated:

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत दारुमाफियांच्या सांगण्यावरुनच माझ्यावर हल्ला झाला होता, असा खुलासा काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी केला आहे. मागील आठवड्यात विधानसभेत त्यांनी हा आरोप केला होता. विधानसभेत आमदार प्रज्ञा सातव म्हणाल्या, हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे करणाऱ्याचा जरब वाढलाय, कारण त्यांना सत्ताधारी नेत्यांकडून पाठबळ मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दारुमाफिया, महिलांच्या अत्याचाराविरोधात मी अनेकदा आवाज उठविला. जनतेसाठी आवाज उठविल्याने मला त्रास सहन करावा लागत आहे. दारुमाफियांच्याविरोधात आवाज उठविला असल्यानेच माझ्यावर त्यांच्या सांगण्यावरुन हल्ला झाला होता, असा खुलासा सातव यांनी विधानसभेत केला. जिल्ह्यात अवैध धंद्यांना राजकीय पाठबळ मिळत असून विरोधकांनी माझ्याविरोधात असे कितीही कट कारस्थाने रचले तरीही जनतेसाठी माझा आवाज कोणीच दाबू शकत नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

हेही वाचा : Maharashtra Politics : ‘मिंधे सरकारच्या गद्दारीची’ अंबादास दानवेंनी पेटवली होळी

पण आता या प्रकरणात नवीन अपडेट आली आहे. या प्रकरणात पोलीस तपास चालू असतानाच पोलिसांकडून यामध्ये स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी आरोपीची पार्श्वभूमी, त्याचा राजकीय पक्षाशी संबंध आहे काय, त्याने कोणाच्या सांगण्यावरून हल्ला केला का…? याबाबत चौकशी करण्यात आली. याशिवाय महिला अंगरक्षकाचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार आरोपी शेळीपालन व मजुरी करतो. तो दारू पिण्याच्या सवयीचा असून, घरात नेहमी वाद करतो, अशी माहिती समोर आली आहे.

आरोपी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही अथवा राजकीय पक्षाशी संबंध नाही.त्याने कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला नसेल त्यांच्याकडून दारूच्या नशेत हा गुन्हा घडल्याचे समोर आले आहे.हा अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आला असल्याचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सांगितले.

नक्की काय झालं होत ?

कळमनुरीच्या कसबे धवांडा इथे सातव दौऱ्यावर असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याजवळ येत पाठीमागील बाजून हल्ला केला. यावेली त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न हल्लेखोराकडून करण्यात आला होता. एका महिला आमदारावर असे हल्ले म्हणजे लोकशाहीवर हल्ला असून पाठीमागून वार करण्यापेक्षा समोरुन या असा सज्जड इशारा सातव यांनी हल्ला झाल्यानंतर दिला होता.

Tags

follow us