Maharashtra Politics : ‘मिंधे सरकारच्या गद्दारीची’ अंबादास दानवेंनी पेटवली होळी

Maharashtra Politics : ‘मिंधे सरकारच्या गद्दारीची’ अंबादास दानवेंनी पेटवली होळी

छत्रपती संभाजीनगर : हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचा मानल्या जाणारा सण म्हणजेच होळी, उत्सव प्राचीन परंपरेनुसार आपण हा सण साजरा करतो. या सणाचे महत्व म्हणजे आजच्या दिवशी सर्व बांधव होलिका उत्सवाच्या निमित्ताने वाईट विचारांचे वाईट प्रवृतिचे दहन करत असतात. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी वाईट विचारांनी आणि वाईट प्रवृत्तीने पाठीत खंजीर खुपसून स्थापन केलेल्या पन्नास खोके घेऊन मिंधे (Shinde Group) झालेल्या सरकारच्या वाईट प्रवृत्तीचे दहन करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मशाल हातात घेऊन होळी पेटवून केली.

पंतप्रधान मोदींचा सामना करणं येड्या गबाळ्यांचं काम नाही, आठवलेंचा ठाकरेंना टोला

शिवसैनिकांसमवेत श्री बाबा साई बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने आयोजित गद्दार व पन्नास खोकेचे प्रतीक असलेल्या होलिकेची दहन करत होलिका उत्सव साजरा केला. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या मुद्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्याकडून साखळी आंदोलन केले जात आहे. दरम्यान यावरून ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जलील यांच्यावर टीका केली.

दरम्यान याबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, इम्तियाज जलील हे खासदार आहेत. तर ज्या पद्धतीने जलील यांनी उपोषण सुरू केलं आहे, ते लाक्षणिक उपोषण आहे. तिथे बिर्याणीच्या पार्ट्या होत आहे. हे सर्व नाटक असून, मुस्लीम तरुणांना मूळ प्रश्नांपासून भरकटवण्यासाठी नाटक सुरु आहे. मुस्लीम मतदार आपल्यापासून दूर जातील यामुळेच इम्तियाज जलील आणि एमआयएमकडून नाटक सुरु असल्याची टीकाही दानवे यांनी केली आहे. तर औरंगजेबाचा उल्लेख दानवे यांनी औरंग्या असा केला. तसेच औरंगजेबाच्या कबरीचा जो मुद्दा मांडला गेलाय, त्यात सगळ्यात आधी औरंगजेबाचे विचार निर्मूलन केलं पाहिजे. त्यानंतर पुढच्या गोष्टी आपोआप होतील असेही दानवे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube