Prajakt Tanpure : नगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमावे लागले आहे. आता याच धर्तीवर ती राहुरीमध्ये नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला असून शेतकरी व नागरिकांनी राहुरी नगरपरिषद कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी तब्बल 20000 शेतकऱ्यांच्या सह्यांची पत्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पाठवले आहे. सरकारने यावर उपाययोजना केल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.
नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर हा पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसतोय अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांना बळी गेला आहे प्रशासनाकडून केवळ नुकसान भरपाई दिली जात असली मात्र नागरिकांचा बळी जात असल्याने आता असंतोषाची भावना तयार होत आहे. राहुरी नगरपरिषद कार्यालयासमोर शेतकरी हे एकवटले व केंद्र सरकारने वन्यजीव संरक्षण कायदा तातडीने बदल करून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी तब्बल 20000 शेतकऱ्यांच्या सह्या करण्यात आलेली पत्र थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली आहे.
कुत्रंप्रमाणे बिबटेही रस्त्यावर फिरतील
बिबट्यांची वाढती संख्या पाहता ज्याप्रमाणे रस्त्यावरती कुत्रे फिरत आहेत तर येणाऱ्या काळात बिबटे ही तसेच रस्त्यावर फिरतील सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा व बिबट्यांबाबत ठोस कारवाई कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राहुरीचे माजी आमदार तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी दिलेला आहे.
गुंतवणूकदारांना दिलासा, आज सेन्सेक्स 558 अंकांनी वाढला तर निफ्टी 25,500 च्या पुढे
बिबट्याला घेऊन आंदोलन
बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची जीवन अत्यंत धोक्यात आले असून या व्यथा मांडण्यासाठी राहुरी मध्ये आंदोलन पुकारण्यात आले यावेळी बिबट्याची वेशभूषा परिधान केलेल्या बालकांना घेऊन शहरातून मिरवणूक काढण्यात आली दरम्यान हा केवळ प्रतीकात्मक बिबट्या आहे. उद्या खराब बिबट्या घराशीला तर याला जबाबदार कोण असा सवाल देखील उपस्थित शेतकऱ्यांनी केला यामुळे केंद्राने यावरती तातडीने निर्णय घ्यावा यासाठी थेट मोदींना पत्र पाठवण्यात आलेली आहे. यावर आता काय निर्णय घेण्यात येणार हे पाहणं देखील महत्त्वाचे असणार आहे.
