Prajakta Mali On Karuna Sharma : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. तसेच त्यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊ नये अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना भाजप आमदार सुरेश धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांचं नाव घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. तर या प्रकरणात प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांना प्रत्यूत्तर दिले. तसेच करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना भावनिक आवाहन देखील या पत्रकार परिषदेमध्ये प्राजक्ता माळीने केलं आहे.
प्राजक्ता माळी या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाल्या की, तुम्ही तुमच्या वौयक्तिक राजकारणासाठी फिल्मी क्षेत्रातील महिलांच्या नावाचा गौरवपर करू नये. सुरेश धस यांनी कुत्सितपणे टिप्पणी करून या गोष्टीचा प्रसारमाध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी गैरवापर केला आहे आणि हे वागणं राज्यातील राजकारण्यांना शोभत नाही. असं प्राजक्ता माळी यांनी म्हटलं आहे.
तर या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पुढे त्या म्हणाल्या की माझी आई गेल्या दीड महिन्यापासुन झोपली नाही आणि माझ्या भावाने सोशल मीडियावरील सर्व अकाउंट डिलीट केले. समाजात अशी प्रतिमा डागाळलं जाणं, एका मुलीची आणि त्यातही फिल्म क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींची हा किती गंभीर प्रकार आहे, हे तुम्ही समजून शकत नाहीत त्यामुळे तुम्ही या गोष्टींचं गाभीर्य ठेवलं पाहिजे. मी याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहे.तसेच माझा नाव फक्त टीआरपी वाढवण्यासाठी करण्यात येत आहे. असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना प्राजक्ता माळी यांनी म्हटलं आहे.
सारथी मार्फत 1 हजार 500 मराठा व कुणबी तरुणांना वाहन चालक प्रशिक्षण उपक्रम
तर दुसरीकडे करुणा शर्मा यांना देखील प्राजक्ता माळींनी आवाहन केलं आहे. मी करुणा ताईंनाही विनंती करू इच्छिते. तुम्ही महिला आहात आणि महिलांना होणार त्रास तुम्ही समजू शकता. पुरुष प्रधान संस्कृतीत महिलाच महिलांच्या पाठी नाही राहिल्या तर कसं होणार. तुम्हाला माझ्याबाबत जी माहिती मिळाली आहे ती चुकीची आहे. तुमचा स्त्रोत चुकीचा आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची खातर जमा केल्याशिवाय करुणा ताई तुम्ही असं करणार नाही, अशी विनंती करते, असं प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे. तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे आणि इतर तीन आरोपींचा शोध घेत आहे.
मोठी बातमी! माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रभारीपदी नियुक्ती