Video : फक्त TRP साठी माझा नावं घेतलं; धसांनी जाहीर माफी मागावी : प्राजक्ता माळी

Prajakta Mali : आमदार सुरेश धस यांनी जी टिपण्णी केली त्याचा निषेध करण्यासाठी मी आले आहे. दिड महिण्यापासुन सगळ्या निगेटिव्ह आणि ट्रोलिंगला मी शांतपणे सामोरे जात आहे. चिखलफेक सुरु असून महिलांची अब्रू जाते. एका कार्यक्रमात सत्कार कार्यक्रमात काढलेला फोटोवरून तुम्ही राजकारण करत आहे. असा प्रत्यूत्तर अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांना दिला.
महाराष्ट्रातील राजकारण्यांना अशा प्रकारचे कृत्य शोभत नाही. महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे नाही तर त्यांच्या कर्तुत्वावर देखील शिंतोडे उडवत असल्याचा आरोप प्राजक्ता माळीने सुरेश धस यांच्यावर केला.
तसेच प्रसारमाध्यमे आपला टीआरपी वाढवण्यासाठी कुठल्या थराला जाऊन बातम्या करतात तुमच्या एका बातमीमुळे एखादा आत्महत्या करू शकतो असं म्हणत, प्रसारमाध्यमांवर देखील या पत्रकार परिषदेमध्ये प्राजक्ता माळीने टीका केली.
तसेच या प्रकरणात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन पत्र देणार आहे. मला जर न्याय मिळाला नाही तर कायद्याच्या चौकटीत राहून मी कलाक्षेत्रातील महिलांसाठी खंबीरपणे नेतृत्व करेल आणि सर्व कलाकार माझ्या पाठीशी उभे आहे. असं या पत्रकार परिषदेमध्ये प्राजक्ता माळीने सांगितले.
तर करुणा मुंडे यांना नोटीस पाठवल्यानंतर त्या शांत बसले आहे. तसेच आज राजकीय हेतूसाठी कलाकारांचा गैरवापर करण्यात येत आहे. महिला कलाकारांची नाहक बदनामी केली जाते. तर करुणा मुंडे यांना नोटीस पाठवल्यानंतर त्या शांत बसले आहे. तसेच आज राजकीय हेतूसाठी कलाकारांचा गैरवापर करण्यात येत आहे. महिला कलाकारांची नाहक बदनामी केली जाते. असेही प्राजक्ताने सांगितले.
माझ्या चारित्र्यासाठी क्लेरिफिकेशन देण्यासाठी मला पत्रिकार परिषद घ्यावा लागते ही महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकीच्या राज्यात निंदनीय आहे. असेही प्राजक्ताने सांगितले.
मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, CM फडणवीसांचे आदेश