Download App

Prakash Ambedkar : मराठा नेत्यांनी आरक्षणाचा फॉर्म्युला द्यावा नसेल तर तसं कबूल करावं; आंबेडकरांचा सल्ला

  • Written By: Last Updated:

Prakash Ambedkar : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मराठा आरक्षण आणि इंडिया की, भारत या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. त्यावर मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाचा एक फॉर्म्युला मांडावा. त्यानंतर जो कायदेशीर आहे. तो स्विकारता येईल. त्याचबरोबर त्यांच्याकडे जर काहीच फॉर्म्युला नसेल तर त्यांनी तसं कबूल करावं. असं आंबेडकर म्हणाले तर संविधानाच्या प्रस्तावनेत इंडिया हा शब्द काढताा येणार नाही. भाजपच्या ट्रॅपमध्ये इंडिया आघाडी अडकली आहे. अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

PGCIL Recruitment 2023 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, पगार 27,000 हजार रुपये

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाचा एक फॉर्म्युला मांडावा. त्यानंतर जो कायदेशीर आहे. तो स्विकारता येईल. त्याचबरोबर त्यांच्याकडे जर काहीच फॉर्म्युला नसेल तर त्यांनी तसं कबूल करावं. म्हणजे या प्रश्नावर लढणाऱ्या स्वयंसेवी संस्था आहेत. त्या त्यांची भूमिका मांडतील. त्यातून काही फॉर्म्युला समोर येईल. तसेच आंबेडकर पुढे म्हणाले की, जर मराठ्यांना निजामाच्या राज्यात आरक्षण मिळत होतं. तर त्यांना या राज्यात देखील आरक्षण मिळावं

इंडिया आणि भारतवर आंबेडकर म्हणाले…

त्याचबरोबर यावेळी इंडिया आणि भारत या मुद्द्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इंडिया शब्द ब्रिटीश कालीन आहे. तसेच तो सर्व कायद्यांमध्ये आहे. आपण जरी स्वातंत्र झालो तरी जुन्या कायद्यापासून फारकत घेता येत नाही. आपण ते सगळे कायदे स्विकृत केलेले आहेत. तर संविधानामध्येही इंडिया दॅट इज भारत असा उल्लेख आहे. त्यामुळे इंडिया की, भारत हे येणाऱ्या सरकारने काय वापरायचं ते वापरावं. तसेच व्यवहारांमध्ये सातत्य राहण्यासाठी आतापर्यंत इंडिया वापरत आले आहेत.

Maratha Reservation : कुणबी दाखला मिळणार? आठ दिवसांत अहवाल द्या; मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

दरम्यान भाजपच्या ट्रॅपमध्ये इंडिया आघाडी अडकली आहे कारण केशवानंद भारती खटल्यामध्ये संविधानाच्या प्रस्तावनेत इंडिया हा शब्द आहे भारत नाही. तर प्रस्तावना ही संविधानाची पाया आहे. त्यात बदल करण्याचा अधिरकार नाही. त्यामुळे तुम्ही इंडिया हा शब्द काढता येणार नाही. त्यात भारत हा शब्द वापरला जाऊ शकतो. मात्र इंडिया हा शब्द तसाच राहणार आहे.

तर दुसरीकडे भाजपने इंडियाची मुद्दा उचलून धरल्याने इंडियाा आघाडीची एक प्रकारे पोलखाल केली आहे. कारण विरोधकांना हे देखील माहित नाही की, इंडिया दॅट इज भारत असं का म्हटलं आहे. तर ही भाजपची राजकीय खेळी आहे. त्यातून प्रचाराचं मैदान तयार केली जात आहे. त्यात इंडीया आघाडी अडकली आहे.

त्याचबरोबर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवत असताना विरोधकांना देखील विश्वासात घ्यायला हवं. त्यामुळे विशेष अधिवेशनावर सोनिया गांधी यांनी मोदी यांना लिहिलेलं पत्र योग्य आहे.

Tags

follow us