Download App

Prakash Ambedkar : … म्हणून आम्ही ‘एमआयएम’शी युती तोडली

  • Written By: Last Updated:

पुणे : राज्याच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि आंध्र प्रदेशमधील ओवेसी यांच्या एमआयएम (MIM) या पक्षाबरोबर मागील निवडणुकीत युती झाली होती. मात्र, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे जाहीरपणे आम्हाला १०० जागा हव्यात असे म्हणायचे. त्यांना त्यांच्या पक्षाचे प्रमुख ओवेसी पाठींबा द्यायचे. त्यामुळे जागा वाटपाच्या मुद्द्यावरून ही युती तुटली. अल्पकाळातच ही युती तुटल्याने सर्वच जण वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना विचारले जात आहे. परंतु, आपल्या आवाक्यापेक्षा अव्वाच्या सव्वा जागांची मागणी केली जात असल्याने आपण स्वतंत्र लढलेले बरे, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी युती तुटण्यामागचे कारण स्पष्ट केले.

एका खासगी वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम बरोबर युती का तुटली, यामागचे कारण सांगितले. आंबेडकर म्हणाले की, एमआयएम पक्षाचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे सातत्याने माध्यमासमोर आम्हाला १०० जागा हव्यात असे सांगायचे तर आम्हाला कानात सांगायचे ८ जागा दिल्या तरी ठीक आहे. मात्र, त्यांच्या या जाहीर वक्तव्याला त्यांच्याच पक्षाचे प्रमुख ओवेसी हेही जाहीरपणे पाठींबा देत होते. मग आम्ही विचार केला की अशा पद्धतीने होणार असेल तर आपण स्वतंत्र लढलेले बरे. त्यामुळे आम्ही एमआयएम बरोबरची ही युती तोडण्याचा निर्णय घेतला.

Tags

follow us