Download App

Video : ‘तेव्हाचं’ आमचा उपरेपणा संपेल; काँग्रेस अन् ठाकरेंच्या वागणुकीवर आंबेडकरांची तिरकी चाल

  • Written By: Last Updated:

नागपूर : आगामी लोकसभेसाठी राज्यात जागावाटपांच्या चर्चांना काही प्रमाणात पडद्यामागे चर्चांच्या फेऱ्यांना सुरूवात झाली आहे. एकीकडे राज्यात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लोकसभेसाठी निवडणुकांच्या मैदानात उतरणार आहेत. मात्र, अद्याप महायुतीच्या जागा वाटपावर अंतिम निर्णय झालेला नाही. तर, दुसरीकडे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि मविआत जागा वाटपांवरून तु-तु मै-मै सुरू आहे. या सर्वामध्ये प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेच्या जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटावर तिरक्या शब्दात टीका करत खंत व्यक्त केली आहे. यावेळी पक्ष तुटलेल्यांनी आपली ताकद पाहावी मग जागा मागाव्या असा टोलादेखील आंबेडकरांनी ठाकरे आणि पवारांना लगावला आहे. ते नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. (Prakash Ambedkar On MVA Loksabha Seat Sharing)

‘आधी बारामती उरकतो मग पुणे..’ अजितदादांच्या धाकट्या चिरंजीवांनी मनावर घेतलं…

ते म्हणाले की, आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या जागावाटपावरून (Loksabha Election) काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत घमासान सुरू असून, या सर्व चर्चामध्ये आम्ही उपरे असल्याची खंत आंबेडकरांनी बोलून दाखवली. ते म्हणाले की, जागा वाटपांबाबत दोन्ही पक्षांची चर्चा होते आणि मग ते आम्हाला बोलावतात. त्यामुळे ज्या काही चर्चांच्या फेऱ्या सुरू आहेत त्यानुसार काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून घमासान सुरू आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे त्यांच्यात सुरू असलेले घमासान संपलं की आमचा उपरेपणा संपले असे मला वाटतं अशी खोचक टिपण्णीदेखील आंबेडकारांनी केली.

लोकसभेसाठी भाजपचं ‘मिड नाईट’ डिस्कशन; आज जाहीर होणार उमेदवारांची पहिली लिस्ट

एकटा लढतो तरी 6 जागा जिंकेल…

आम्हाला किती जागा सोडल्या हे वृत्तपत्र आणि माध्यमांद्वारेच कळाल्याचे सांगत आम्ही जरी एकटे लढलो तरी किमान सहा जागा जिंकू अशा स्थितीत आहे, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. पत्र देतानाच आम्ही सर्व 48 जागांसाठीच्या उमेदवारांची तयारी केल्याचाही उल्लेख आंबेडकरांनी यावेळी केला.

ठाकरेंना 21 तर शरद पवारांना 11 जागा

शिवसेना उद्धव ठाकरे गट लोकसभा निवडणुकीत 23 जागांवर लढणार असल्याची (Lok Sabha Election) माहिती आहे. या 23 पैकी 2 जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे. काँग्रेसच्या वाट्याला 15 ते 17 जागा मिळतील अशी शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार गटाला 11 जागा मिळतील. जर वंचित बहुजन आघाडी सोबत असेल तर त्यांना अकोल्याची जागा सोडण्याची तयारी करण्यात आली आहे. तसेच आणखी एक ते दोन जागा वंचितला देण्यात येतील, हे जागावाटप महाविकास आघाडीचं आहे.  यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीतून जागावाटपाचा असा फॉर्म्यूला समोर येत आहे.

दादा भुसे अन् महेंद्र थोरवे भिडले! शिंदे गटाच्या आमदारांचा विधिमंडळाच्या लॉबीत जोरदार राडा

मुंबईतील चार जागा लढण्यासाठी उद्धव ठाकरे गट इच्छुक आहे. उत्तर मुंबई मतदारसंघात लढण्यास शरद पवार गट उत्सुक नाही. उत्तर मुंबईची जागा कुणी लढणार नसेल तर ठाकरे गट लढेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. राज्यात जे एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यातील 23 जागांचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला आहे. या 23 जागांपैकी 21 जागा ठाकरे गट लढणार आहे तर दोन जागा मित्रपक्षांना दिल्या जातील असे सांगण्यात येत आहे.

200 आमदार, 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री तरीही..,; पवारांच्या शिलेदाराची फटकेबाजी

यानंतर आघाडीतील दुसरा मोठा पक्ष काँग्रेसच्या वाट्याला 15 ते 17 जागा येतील अशी माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार गटाला 9 ते 11 जागा मिळतील तसेच वंचित बहुजन आघाडीला अकोल्याची जागा सोडण्याची तयारी मित्रपक्षांची आहे. या व्यतिरिक्त वंचित आघाडीला आणखी एक ते दोन जागा मिळतील अशीही शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

 

follow us