लोकसभेसाठी भाजपचं ‘मिड नाईट’ डिस्कशन; आज जाहीर होणार उमेदवारांची पहिली लिस्ट
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपनं (BJP) कंबर कसली असून, राजधानी नवी दिल्ली येथे काल (दि. 29) भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं ‘मिड नाईट’ डिस्कशन पार पडले आहे. या बैठकीत देशभरात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी ग्राऊंड रिअॅलिटी समजून घेत मायक्रो प्लॅनिंग करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मायक्रो प्लॅनिंगसह या बैठकीत 16 राज्यांतील उमेदवारांची नावेदेखील निश्चित झाली असून, पहिली यादी आज (दि. 1) जाहीर होण्याची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. मात्र, काल पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रातील उमेदवारांबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांबद्दलची उत्सुकता आणि धाकधूक कायम आहे. (BJP Poll Body Meeting First List For Loksabha Election 2024 Maybe Out Today)
‘महायुतीला स्पर्धकच नाही, 48 जागा जिंकणार’; तानाजी सावंतांचा मोठा दावा
आगामी लोकसभेसाठी महाराष्ट्रातील 8 मतदारसंघाचा समावेश असून, भाजपकडून जाहीर करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या यादीत महाराष्टातील (Maharashtra Loksabha Election) कोणते उमेदवार असणार याची उत्सुकता वाढली असून, गोपाळ शेट्टी, नितीन गडकरी, रावसाहेब दानवे आदींची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. यापैकी नेकमी कुणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महायुतीत जागावाटपावरून तिढा! रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपचीच; राणे शड्डू ठोकत मैदानात
रात्री 11 वाजता सुरू झालेली बैठक मध्यरात्री आटोपली
आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुशंगाने भाजपने विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी काम सुरू केले आहे. या धर्तीवर राजधानी नवी दिल्ली येथे काल पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक रात्री 11 वाजता सुरू झाली आणि पहाटे 03.20 पर्यंत चालली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत 16 राज्यांतील अनेक उमेदवारांच्या नावांना मंजुरी देण्यात आली असून, भाजप उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करू शकते असे सांगितले जात आहे.
आघाडीचं जागावाटप ठरलं? ठाकरेंना 21 तर शरद पवारांना 11 जागा; फॉर्म्यूला काय?
वरिष्ठ नेत्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत देशातील सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेल्या उत्तर प्रदेशातील उमेदवारांवर विचारमंथन करण्यात आले. यात यूपीच्या उमेदवारांबाबत सुमारे 25 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर पश्चिम बंगालमधील सर्वच्या सर्व 42 जागांवर विचारमंथन करण्यात आले. याशिवाय बैठकीत छत्तीसगडच्या सर्व लोकसभेच्या जागांवर चर्चा झाली असून, जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीत छत्तीसगडमधील लोकसभेच्या चार जागांसाठी भाजप आज उमेदवार जाहीर करू शकते.
तेलंगणाबाबत भाजप आशावादी
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं तीन राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली. मात्र, तेलंगाणा काबीज करण्यात भाजप अपयशी ठरलं होतं. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण भारत काबीज करण्याची इच्छा बाळगणाऱ्या भाजप यंदाच्या लोकसभेत तेलंगाणासह अन्य मतदार संघात विजयी पताका फडकवण्यासाठी आशावादी असल्याचे चित्र आहे.
…आता कमळावर निवडून येणारा खासदार हवा; रामटेक अन् नाशिकमध्ये भाजपकडून शिंदेंची कोंडी
कोणत्या 16 राज्यांतील उमेदवारांची चर्चा झाली?
भाजप केंद्रीय निवडणूक समितीने ज्या 16 राज्यांच्या लोकसभा उमेदवारांवर विचारमंथन केले त्यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, उत्तराखंड, आसाम, गोवा, दिल्ली आणि जम्मू-काश्मीर यांचा समावेश आहे. तर, आसामचे सुमारे 40 टक्के उमेदवार बदलले जातील असे सांगितले जात आहे.
काँग्रेसची विचारमंथन पुढील आठवड्यात
भाजपसह काँग्रेसनंदेखील लोकसभेची जोरदार तयारी करण्यास सुरूवात केली असून, पक्षाकडून अर्धा डझनहून अधिक राज्यांची स्क्रीनिंग प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केरळ, मध्य प्रदेश आणि ईशान्येकडील जवळपास सर्व राज्यांमध्ये स्क्रीनिंग करण्यात आले असून, आता केवळ उमेदवारांची नावे जाहीर करणे बाकी आहे. पुढील आठवड्यात काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून, त्यात उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली जाऊ शकते. या यादीत सुमारे 100 उमेदवारांची नावे असू शकतात. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकीत यूपी, पंजाब, चंदीगड, उत्तराखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या लोकसभा जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार आहे.