PM मोदींसाठी ‘यवतमाळ’ ठरते लकी : सलग तिसऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात

PM मोदींसाठी ‘यवतमाळ’ ठरते लकी : सलग तिसऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (28 फेब्रवारी) यवतमाळ दौऱ्यावर आहेत. आजच्या दौऱ्यात मोदींच्या उपस्थितीत भव्य महिला मेळावा पार पडणार आहे. यासोबतच वरोरा वणी महामार्गावरील 18 कि.मी. चौपदरीकरण कामाचे लोकार्पण, सलाईखुर्द तिरोरा महामार्गाविरील 42 कि.मी. काँक्रिटीकरण रस्त्याचे लोकार्पण, साकोली – भंडारा जिल्हा सीमेपर्यंतच्या 55.80 कि.मी. दुपदरी रस्त्याचे लोकार्पण, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील सहा प्रकल्पांचे लोकार्पण, बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील 45 सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण अशा विविध विकास कामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या आताच्या यवतमाळ दौऱ्याच्या निमित्ताने आणखी एका खास गोष्टीची चर्चा होत आहे. ते सलग तिसऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election)  जिल्ह्यात येत आहेत. 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी यांचा यवतमाळ दौरा पार पडला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपने दणदणीत बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली होती. तर मोदी पंतप्रधानपदीही विराजमान झाले होते. त्यामुळे यवतमाळ त्यांच्यासाठी लकी असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता सलग तिसऱ्या निवडणुकीत त्यांचा यवतमाळ दौरा पार पडत आहे. (Prime Minister Narendra Modi is coming to Yavatmal ahead of the third consecutive Lok Sabha elections.)

Amit Shah : उद्धव ठाकरेंचं स्वागत करणार का? अमित शाहांचं एकाच वाक्यात उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्या लोकसभेपूर्वी जिल्ह्यात

20 मार्च 2014 : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी येथे शेतकऱ्यांसमवेत ‘चाय पे चर्चा’ करून शेतमालास हमीभाव देण्याची ग्वाही दिली होती.

16 फेब्रुवारी 2019 : लोकसभा निवडणुकीपूर्वी केळापूर येथे महिला मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते.

28 फेब्रुवारी 2024 : आता तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीपूर्वीच महिला मेळाव्यासाठी विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भुमिपूजन कार्यक्रमासाठी यवतमाळला येत आहेत.

विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भुमिपूजन :

वरोरा वणी महामार्गावरील 18 कि.मी. चौपदरीकरण कामाचे लोकार्पण

सलाईखुर्द तिरोरा महामार्गाविरील 42 कि.मी. काँक्रिटीकरण रस्त्याचे लोकार्पण

साकोली – भंडारा जिल्हा सीमेपर्यंतच्या 55.80 कि.मी. दुपदरी रस्त्याचे लोकार्पण

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील सहा प्रकल्पांचे लोकार्पण

बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील 45 सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण

मोठी बातमी! गुजरातमध्ये तब्बल 3300 किलो अंमली पदार्थ जप्त; 5 जणांना अटक

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील न्यू आष्टी अंमळनेर टप्प्याचे लोकार्पण आणि अंमळनेर न्यू आष्टी स्टेशनपर्यंत विस्तारित रेल्वे सेवेचा शुभारंभ

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गावरील वर्धा-कळंब (जि. यवतमाळ) या टप्प्याचे लोकार्पण व नवीन रेल्वे गाडीचा शुभारंभ

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत 5.50 लाख महिला बचत गटांना रु. 825 कोटी फिरत्या निधीचे वितरण

इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजनेचा शुभारंभ

आयुष्मान भारत अंतर्गत महाराष्ट्रात 1 कोटी आयुष्मान कार्डचे वितरण

पीएम किसान सन्मान निधीच्या 16 व्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरण

यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण

नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दुसऱ्याा आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज