Prakash Ambedkar : शरद पवार आजही भाजपसोबत… असे का म्हणाले ?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आणि माझा काही बांधाला बांध नाही. आमचं सख्य जगजाहीर आहे. मात्र, शरद पवार यांच्या या भूमेकेमुळे महाविकास आघाडीला कमी आणि भारतीय जनता पार्टीला जास्त फायदा होत आहे. त्याला कारणीभूत शरद पवार यांची भूमिका आहे. कारण ते हात दाखवतात डावीकडे अन जातात उजवीकडे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा […]

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आणि माझा काही बांधाला बांध नाही. आमचं सख्य जगजाहीर आहे. मात्र, शरद पवार यांच्या या भूमेकेमुळे महाविकास आघाडीला कमी आणि भारतीय जनता पार्टीला जास्त फायदा होत आहे. त्याला कारणीभूत शरद पवार यांची भूमिका आहे. कारण ते हात दाखवतात डावीकडे अन जातात उजवीकडे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न मला पडतो. शरद पवार हे आजही भाजपबरोबर आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केला.

एका खासगी वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर बोलत होते. शरद पवार ते शिवसेना आणि भाजप ते सिकेपी अशी विस्तृत मांडणी केली. तसेच सध्या महाविकास आघाडीत मी नाही. परंतु, भविष्यात मला महाविकास आघाडीसोबत घेऊन जायची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. त्यामुळे त्या संदर्भात ठाकरे हेच अधिक सांगू शकतील असे सांगत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शरद पवार हे भाजपबरोबर आहेत. हे त्यांनी देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्याबरोबर पहाटे-पहाटे सरकार स्थापन करून सिद्ध केले आहे. अजित पवार यांना शरद पवार यांनीच पाठवले होते. त्यामुळे मला शरद पवारांवर विश्वास नाही. याचे दुसरे उदाहरण सांगतो. १९९० ला शरद पवार हे मुख्यमंत्री असताना सुप्रिया सुळे यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, माझे वडील कधी काय बोलतील आणि कधी काय सांगतील यावर माझा विश्वास नाही. एक मुलगीच जर आपल्या वडिलांविषयी असे बोलत असेल तर मी का शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवू. शरद पवार कालही आणि आजही भाजपबरोबर आहेत, हे मला ठामपणे माहित आहे.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेची गरज होती. शिवसेनेला तितकीसी नव्हती. मात्र, शिवसेनेने सत्ता सोडायला नको होती. या सर्व प्रकारात शरद पवारांनी आपला हेतू शिवसेनेला घेऊन साध्य केला. मात्र, शरद पवारांची भूमिका गेल्या अडीच वर्षात आणि आजही भाजपला पूरक आहे, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
https://www.youtube.com/watch?v=Wwgt9ygSGq4&t=12s
Exit mobile version