माणिकराव कोकाटे यांना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? प्रकाश आंबेडकर यांची आगपाखड

क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतरही ते अद्याप समोर न येणे, ही अत्यंत गंभीर बाब!

Untitled Design (117)

Untitled Design (117)

Prakash Ambedkar Speaks On Manikrao Kokate : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे(Manikrao Kokate) यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतरही ते अद्याप समोर न येणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी केली आहे. “मंत्र्यालाच पोलिसांनी पळवले असेल तर सामान्य जनतेच्या सुरक्षिततेचं काय?” असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला. न्यायालय आणि कायद्यालाही न जुमानणारी ही स्थिती असल्याचा टोला त्यांनी लगावला.

कोकाटे यांना मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार लपवून ठेवले जात असल्याची शंका निर्माण होत असल्याचा आरोप करत, आंबेडकर यांनी लोकप्रतिनिधींना दोन वर्षांची शिक्षा झाली तर त्यांचा मतदानाचा अधिकार संपुष्टात येतो, याची आठवण करून दिली. त्यामुळे कायदा आणि न्यायालयाचा अवमान होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

कोकाटेंचा पत्ता कट होण्याचे संकेत, मंत्रिपदासाठी धनुभाऊंची दिल्लीत फिल्डिंग, शाहंची घेतली भेट

नगरपालिका निवडणुकांबाबत बोलताना आंबेडकर यांनी भाजप वगळता अन्य सर्व पक्षांसोबत युती झाल्याचे सांगितले. आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपविरोधी आघाडी उभारण्यात येणार असून, त्यासाठी स्थानिक नेतृत्वाला निर्णयस्वातंत्र्य देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात शिंदे गटाने चार दिवस प्रतीक्षा करण्याचे दिलेले आवाहनही चर्चेसाठी खुले असल्याचे संकेत त्यांनी दिले.

हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी झालेल्या भेटीबाबत कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे सांगत ही भेट त्यांच्या मुलीच्या इंग्लंडमधील शिक्षणासंदर्भातील चर्चेसाठी असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने मनसेसोबत हातमिळवणी करून स्वतःची राजकीय विश्वासार्हता गमावली असून, त्यामुळे कोकणातील कुणबी समाज, माथाडी कामगार आणि अमराठी वर्ग शिवसेनेपासून दुरावल्याचा दावाही त्यांनी केला.

कायद्यानुसार कोकाटेंच मंत्रिपद अन् आमदारकी गेली; सचिवालय चूक करतय, कायदेतज्ज्ञ असिम सरोदेंनी ठेवल कायद्यावर बोट

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी बोलताना आंबेडकर म्हणाले की, राजकारणात असताना अनेक संवेदनशील बाबी माहिती असतात, मात्र ज्या गोष्टी देशाच्या हिताच्या नसतात, त्या सार्वजनिक मंचावर मांडू नयेत, याची जाणीव ठेवणे आवश्यक असते. पृथ्वीराज चव्हाण यांनी हे भान राखणे गरजेचे होते, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

Exit mobile version