मला आणखी एक संधी द्या, व्हायरल व्हिडिओ कॉंट्रोव्हर्सीनंतर प्रणित मोरेने समोर येत मागितली माफी

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कॉमेडियन प्रणित मोरे याने घडलेल्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त करत स्वतःची चूक मान्य केली.

Untitled Design 85

Untitled Design 85

Pranit More came forward and apologized : बिग बॉस 19 फेम स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे सध्या त्याच्या शोमधील एका व्हायरल क्लिपमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शो सुरू असताना एका प्रेक्षकाने डेटवर गेलेय मुलींबाबत आक्षेपार्ह आणि अश्लील वक्तव्य केले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रणित मोरेवर देखील टीकेची झोड उठवली गेली होती. या संपूर्ण प्रकरणावर आता प्रणित मोरेने चुप्पी तोडत सोशल मीडियाच्यामाध्यमातून माफी मागितली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने घडलेल्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त करत स्वतःची चूक मान्य केली.

मला हे खूप दिवसांपासून बोलायचं होतं. मात्र, माझं इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड झाल्यामुळे मी प्रतिक्रिया देऊ शकलो नाही. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्तीने अत्यंत चुकीच्या गोष्टी बोलल्या होत्या. त्यावेळी सभागृहातील अनेक जण हसत होते आणि त्याच वातावरणात मी देखील संभाषण पुढे नेलं. हीच माझी सर्वात मोठी चूक होती. मला त्याच क्षणी थांबवायला हवं होतं, पण मी ते केलं नाही. उलट त्याला अशा प्रकारच्या वक्तव्यांसाठी एक व्यासपीठ मिळाल, याची जबाबदारी मी स्वीकारतो, असं या व्हिडिओच्या माध्यमातून प्रणित मोरे याने स्पष्ट केलं आहे.

एलॉन मस्क बनले जगातील पहिले ट्रिलेनियर! 75 अब्ज डॉलर्स उभारत Space X ही ठरला जगातील सर्वात मोठा आयपीओ

यावेळी त्याने प्रेक्षकांसह सर्व संबंधितांची माफी मागत सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेलाही सहकार्य करत असल्याचे स्पष्ट केले. माझ्याविरोधात सुरू असलेल्या प्रत्येक कायदेशीर प्रक्रियेला मी पूर्ण सहकार्य करत आहे. मात्र, मला सर्वांना एक विनंती करायची आहे की मला स्वतःला सुधारण्याची एक संधी द्या. या घटनेतून मला मोठा धडा मिळाला आहे. मी स्वतःवर आणि माझ्या कंटेंटवर गंभीरपणे काम करत आहे. भविष्यात माझ्या कामातून हा बदल निश्चितपणे दिसून येईल, असेही त्याने नमूद केले.

प्रणित मोरेच्या या माफीनाम्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी त्याच्या प्रामाणिक कबुलीचे स्वागत केले आहे, तर काहींनी या प्रकरणात अधिक जबाबदारीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Exit mobile version