मुंबईतील कबुतरखान्यांवरून संघर्ष तीव्र, मंगलप्रभात लोढा मुनी निलेशचंद्र महाराजांच्या निशाण्यावर

मुंबईतील कबुतरखाने बंद असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट लोढा यांच्यावर निशाणा साधला असून आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 21T104834.640

Muni Nileshchandra Maharaj criticizes Mangal Prabhat Lodha : राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील जैन समाजाचा आवाज दाबल्याचा गंभीर आरोप मुनी निलेशचंद्र महाराज यांनी केला आहे. मुंबईतील कबुतरखाने बंद असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट लोढा यांच्यावर निशाणा साधला असून, या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कबुतरखाने तातडीने सुरू न झाल्यास मोठे आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मुंबईत रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुनी निलेशचंद्र महाराज यांची सुमारे आठ महिन्यांनंतर पुन्हा भेट झाली.

यापूर्वी आझाद मैदानावर झालेल्या जैन समाजाच्या आंदोलनावेळी कबुतरांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आठ महिने उलटूनही मुंबईतील कबुतरखाने सुरू झालेले नाहीत, असा आरोप मुनी निलेशचंद्र महाराज यांनी केला. पायधुनी येथील गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिरासह मुंबईतील कबुतरखान्यांमध्ये दाणा-पाणी बंद असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्यासमोर हा प्रश्न पुन्हा उपस्थित करत तातडीने तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली. कबुतरखाने सुरू झाले नाहीत तर गोडीजी मंदिरासमोर मोठे आंदोलन छेडण्यात येईल आणि आमरण उपोषण केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

राज ठाकरेंबाबत वक्तव्य करणं पडलं महागात, महेश मोटेच्या चेहऱ्याला काळं फासलं, डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा

याचवेळी मुनी निलेशचंद्र महाराज यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर थेट टीकास्त्र सोडले. मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाचा आवाज दाबला आहे, असा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतरही कबुतरखाने सुरू झाले नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरून मुंबईत यापूर्वीही वाद निर्माण झाला आहे. जैन समाजाच्या काही संघटना आणि धार्मिक नेत्यांकडून कबुतरांना दाणा-पाणी देण्याची व्यवस्था पुन्हा सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.

सौदीवर हौथींच्या हल्ल्यांचा धोका वाढला, अमेरिकेकडून पश्चिम आशियासाठी ट्रॅव्हल अलर्ट जारी

दुसरीकडे, या विषयाशी सार्वजनिक आरोग्य आणि न्यायालयीन निर्देशांचाही संबंध असल्याने हा मुद्दा अधिक संवेदनशील बनला आहे. आता मुनी निलेशचंद्र महाराज यांनी थेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर आरोप केल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे, कबुतरखान्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याची भूमिका त्यांनी घेतल्याने सरकारवरही दबाव वाढण्याची शक्यता आहे. आंदोलन आणि आमरण उपोषणाचा इशारा दिल्यामुळे येत्या काळात हा वाद आणखी तीव्र होतो का, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मुनी निलेशचंद्र महाराज यांनी केलेल्या आरोपांवर मंगलप्रभात लोढा किंवा भाजपकडून काय प्रतिक्रिया दिली जाते आणि मुंबईतील कबुतरखान्यांबाबत सरकार कोणती भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us