Download App

शिवरायांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या कोरटकरला कुणाचं अभय?, दुबईला झाला फरार? फोटो आले समोर

प्रशांत कोरटकर याला अटक कारवाईपासून अंतरिम संरक्षणाचा तातडीचा दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार

  • Written By: Last Updated:

Prashant Kortkar absconded to Dubai : इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेला नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर हा परदेशी पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (Kortkar ) कोलकाता विमानतळावरुन तो दुबईला पळाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कोरटकरचा दुबईतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अखेर कोरटकरने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्याच आता बोललं जात आहे.

प्रशांत कोरटकरला दिलासा! कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही

पोलिसांनी नुकतीच प्रशांत कोरटकरच्या पत्नीची चौकशी केली होती. त्यावेळी तिने पती चंद्रपूरला गेल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांचं पथक चंद्रपूरला रवाना झालं होतं. परंतु, त्याचवेळी कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, ही जुनी सोशल मीडिया पोस्ट असल्याचा दावाही एकीकडे केला जात असल्याने ट्विस्ट वाढला आहे.

दिलासा नाही

प्रशांत कोरटकर याला अटक कारवाईपासून अंतरिम संरक्षणाचा तातडीचा दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. तसेच त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी ठेवली. न्या. राजेश पाटील यांच्यासमोर याविषयी प्राथमिक सुनावणी झाली. तेव्हा, अर्जाची प्रतच अद्याप मिळाली नसल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. न्यायमूर्तींनी अर्जावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली. तसंच, तोपर्यंत कोरटकर याला कोणतेही संरक्षण देण्यास नकार दिला आहे.

follow us

संबंधित बातम्या