प्रशांत कोरटकरला दिलासा! कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही

प्रशांत कोरटकरला दिलासा! कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही

Relief to Prashant Koratkar No need to physically present in court : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. कारण कोर्टाने कोरटकरला सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे तसेच पोलिसांनी केलेली विनंती कोर्टाने फेटाळे या प्रकरणाचा पुढची सुनावणी 17 मार्चपासून दररोज होणार आहे.

संग्राम कोते यांना न्याय मिळणार का? अजितदादा पारड्यात विधानपरिषदेचे झुकत माप टाकणार का?

कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना अचानक फोन करुन प्रशांत कोरटकर या व्यक्तीनं शिवीगाळ करायला सुरुवात केली होती. तसंच चुकीचा इतिहास का सांगता असं विचारताना त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लीप खुद्द इंद्रजीत सावंत यांनी पत्रकार परिषद घेत समोर आणली होती. तसंच कोरटकरवर कारवाईची मागणी केली होती. यासाठी त्यांनी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.

ब्रेकिंग! बीडमध्ये पोहोचण्याआधीच ‘खोक्या’ला मोठा धक्का, सतीश भोसलेच्या तडीपार कारवाईला सुरूवात

दरम्यान, इंद्रजीत सावंत यांची पोलिसांनी या प्रकरणी सात तास चौकशी केली होती. तसंच, त्यांच्या फोनवर आलेल्या या कॉलची फॉरेन्सिक तपासणी केली. तसंच सीडीआर देखील तपासले यामध्ये हा फोन कॉल खरा असल्याचं उघड झालं, त्यामुळं या ऑडिओ क्लीपमध्ये कुठलीही छेडछाड झालेली नसून तो कोरटकरचाच आवाज असल्याचं स्पष्ट झालं आहे.

ऑडिओ क्लीप फेकचा दावा

कोरटकरच्या आक्षेपार्ह विधानामुळं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर राज्यातील विविध भागांमध्ये या प्रशांत कोरटकरविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या. हे प्रकरण पेटल्याचं लक्षात येताच कोरटकरनं घुमजाव करत आपला हा आवाज नसल्याचा दावा केला. तसंच ही फेक ऑडिओ क्लीप असल्याचंही त्यानं म्हटल. पण अखेर त्याचा हा दावा फोल ठरला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube