Sarangi Mahajan allegations against Dhananjay Munde : बीडमध्ये सध्या अनेक प्रकरणं सुरू आहेत. त्यामध्ये जमीन हडपण्याचा एक मुद्दा समोर आलाय. प्रविण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्रीवर भेट घेणार आहेत. सकाळी मी अजितदादांना भेटले. माझी जिरेवाडी 202 मध्ये जमीन आहे, ती धनजंय मुंडे (Dhananjay Munde) आणि त्याच्या लोकांनी हडप केलीय. त्याच्यामध्ये गोविंद मुंडे आहे. तो धनंजय मुंडे यांच्या घरचाच नोकर आहे. त्याने पुढाकार घेवून माझ्याशी संपर्क साधून पूर्ण जमीन हडप केली, असा आरोप प्रविण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन (Sarangi Mahajan) यांनी केलाय.
धाक दाखवून आम्हाला रजिस्ट्री लावून घेतली. जोपर्यंत सह्या केल्या नाही, तोपर्यंत सोडलं नाही. त्याने आमच्याकडून शंभर रूपयाच्या कोऱ्या स्टॅम्पवर देखील सह्या करून घेतल्या. जोपर्यंत सह्या करत नाही, तोवर परळी सोडू देणार नाही अशी धमकी दिली. यांचं सत्ताकारण, राजकारण लखलाभ. यामध्ये पंकजा आणि धनंजय दोघांचाही हात आहे. हे प्रकरण 6 जून 2022 ला रजिस्ट्री लावून घेतली आहे. आम्हाला एक महिन्याने इसार पावती पाठवली. त्यामध्ये जमिनीचं ट्राझंक्शन खोटं करून घेतलं असं समजल्याचं सारंगी महाजन यांनी (Pravin Mahajan Wife) सांगितलं.
अमोल मिटकरींना बडी मुन्नी बोलायला लावतेय, त्या मुन्नीची सुन्नी करतो; धसांनी सांगितला बोलवता धनी
याप्रकरणानंतर न्याय मागण्यासाठी मी अजितदादांकडे गेले होते. 18 ऑक्टोबर 2024 ला कोर्टात केस टाकली आहे. जेव्हा मला समजलं की साडेतीन करोडची जमीन 20-21 लाखात दिला. दोन-तिन दिवसांत त्यांनी सातबाऱ्यावर नावं बदलली (Maharashtra Politics) होती. ही जमीन गोविंद माधव मुंडेंच्या नावावर आहे. तो धनंजय मुंडेंच्या घरचा नोकर आहे. दीड वर्ष मी धनंजयला फॉलोअप केला. मामीला मदत कर असं म्हटले. त्यानंतर धनंजय टाळाटाळ करू लागला. परळीत गेल्यावर भेटायचा नाही, तो बाहेर निघून जायचा असं देखील सारंगी महाजन म्हणाल्या आहेत.
मी परळीचा किंग आहे, मामी तुला जमीन मिळवून देतो असं धनंजय मुंडे मला म्हणाला होता. ज्या व्यक्तीने माझी जमीन एका नोकराच्या माध्यमातून लाटली. त्याच चोराकडे मी गेले आहे, असं समजल्यानंतर मी कोर्टात धाव घेतली. वाल्मिक कराडची माझी कधी भेट प्रत्यक्ष झाली नाही. परळीत आल्यानंतर पंकजा, धनंजयला कळतं, असा मला धाक दाखवण्यात आला होता. तुमच्या जागेवर पंकजाने झोपडी बांधली आहे. त्याच्यावर एक जोडपं ठेवून गायी-गुरे ठेवली आहेत, असं गोविंद मुंडेंनी सांगितलं होतं.
VIDEO : विधानसभेसाठी केजरीवालांची मोठी खेळी, भाजप मंदिर समितीच्या 100 सदस्यांचा आपमध्ये प्रवेश
धनंजय मुंडे याचा डाव आहे. तीन वर्षांनी तो जमीन स्वत:च्या नावावर करून घेतो, असं त्या म्हणाल्या आहेत. याप्रकरणी अजित पवारांनी देखील विश्वास दिलाय. न्याय मिळेल, त्याचसाठी मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आलेय. जो नातेवाईकांना सोडत नाही, तर तो सामान्य नागरिकांना किती लुटत असेल असा सवाल देखील सारंगी महाजन यांनी केलाय. मतं दिलं नाही तर धनंजय जमिन लाटतो, असं तेथील नागरिक सांगतात. यांचे टोळभैरे लोक आमच्या लेकी-सुनांवर हात टाकतात, असं देखील त्या म्हणाल्या आहेत.