अमोल मिटकरींना बडी मुन्नी बोलायला लावतेय, त्या मुन्नीची सुन्नी करतो; धसांनी सांगितला बोलवता धनी

अमोल मिटकरींना बडी मुन्नी बोलायला लावतेय, त्या मुन्नीची सुन्नी करतो; धसांनी सांगितला बोलवता धनी

Suresh Dhas : आमदार मोल मिटकरींनी (Amol Mitkari) सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. धस यांच्यावर खंडणी, हत्या आणि जमिनी बळकावल्या. इतिहासात सुरेश धस हेच आका आहेत, असा आरोप मिटकरींनी केला. त्या आरोपांना धस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. राष्ट्रवादीतील (NCP) एक बडी मुन्नी अमोल मिटकरी, सूरज चव्हाण यांच्यासारख्या बारक्या सारक्यांना बोलायला लावतेय. त्या बडी मुन्नीने पुढे यावं, मी मुन्नीची सुन्नी करतो, असं म्हणत धस यांनी मिटकरींचा बोलवता धनी दुसराच असल्याचं सुचवलं.

अरे तुझं वजनच 35 किलो अन् म्हणतोयं..,;’घरात घुसून मारीन’म्हणणाऱ्या जरांगेंवर हाकेंची गाडी सटकली 

सुरेश धस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मिटकरींनी केलेल्या टीकेविषयी विचारलं असता ते म्हणाले की, अमोल मिटकरी जे आरोप करत आहेत, त्या आरोपात तथ्य राहिलं नाही. मला क्लिनचीट मिळालेली आहे. मिटकरी हे पहिली-दुसऱीच्या वर्गात आहेत, मी त्यांना अनेकदा समज दिलेली. चड्डीत असल्यापासून ते तुम्ही आजपर्यंत जे काही आरोप केले आहेत, त्या सर्वात मला क्लिनचीट मिळाली आहे. कोणताही चौकशी माझ्यावर लावा. काहीही सापडणार नाही. आता ते संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असं धस म्हणाले.

अरे तुझं वजनच 35 किलो अन् म्हणतोयं..,;’घरात घुसून मारीन’म्हणणाऱ्या जरांगेंवर हाकेंची गाडी सटकली 

पुढं ते म्हणाले की, मिटकरी हे स्वतः बोलत नाही, कोणीतरी मुन्नी त्यांना बोलायला लावते, ही बडी मुन्नी अमोल मिटकरी, सूरज चव्हाण यांच्यासारख्या बारक्या सारक्याांना बोलायला लावते. त्या बडी मुन्नीने पुढे यावे, ही बडी मुन्नी कोण आहे, ते बड्या मुन्नीला ठाऊक आहे. बड्या मुन्नीनं इथं यावं, मी मुन्नीची सुन्नी करतो, असं म्हणत धस यांनी मिटकरींचा बोलवता धनी दुसराच असल्याचं सुचवलं.

माझाही सीडीआर काढा
वाल्मिक कराडचा आणि माझा संबंध असेल तर माझाही सीडीआर काढा. मी कोणत्या कामासाठी वाल्मिक कराडला फोन केला, ते समोर येईल असं म्हणत अमोल मिटकरींचा तेरेनाम झाला, अशी टीका धस यांनी केली.

राष्ट्रवादी मारेकऱ्यांना पाठीशी घालते का?
राष्ट्रवादी मारेकऱ्यांना पाठीशी घालते का? अरे मेलेल्या माणसांच्या बाजून उभं राहा. संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यात कोणी आडवं आलं तर त्यांच्यावरही कारवाई करावी, असं धस म्हणाले.

लक्ष्मण हाके यांनीही धस यांच्यावर आरोप केले. धस यांनी देवाच्या जमिनी हडपल्या असं ते म्हणाले. या आरोपांविषयी विचारलं असता धस म्हणाले की, हा कोण ओबीसी नेता, कोण हाके? असं म्हणत धस यांनी मिटकरी आणि हाकेंना महत्व देत नसल्याचं म्हटलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube