‘तुनिषावर इस्लाम धर्म स्वीकारण्याचा दबाव’, तुनिषाच्या आईचा आरोप

मुंबई : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दिवंगत अभिनेत्रीची आई वनिता शर्मा यांनी यापूर्वीच तिचा सहकलाकार शेजान खानवर आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. शेजान खान पोलीस कोठडीत असून पोलीस या प्रकरणाच्या तपासात सातत्याने सक्रिय आहेत. दरम्यान, तुनिषा शर्माच्या आईने शेजान खानबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. वनिता शर्मा […]

WhatsApp Image 2022 12 30 At 4.44.11 PM

WhatsApp Image 2022 12 30 At 4.44.11 PM

मुंबई : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दिवंगत अभिनेत्रीची आई वनिता शर्मा यांनी यापूर्वीच तिचा सहकलाकार शेजान खानवर आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.

शेजान खान पोलीस कोठडीत असून पोलीस या प्रकरणाच्या तपासात सातत्याने सक्रिय आहेत. दरम्यान, तुनिषा शर्माच्या आईने शेजान खानबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

वनिता शर्मा यांनी सांगितले की, शेजान त्यांच्या मुलीची फसवणूक करत होता. तुनिशाने त्यांना सांगितले होते की शेजान ड्रग्स सेवन करतो. तिच्या (तुनिषाच्या) वागण्यातही काही बदल दिसून आले होते. शेजानने तिला इस्लाम धर्माचे पालन करण्यास भाग पाडले. शेजानला शिक्षा होईपर्यंत मी गप्प बसणार नाही, असे त्यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की तुनिषाने एकदा फोन तपासला होता आणि तिला कळले की शेजान तिची फसवणूक करत आहे. याबाबत तिने शेजानला विचारले असता त्याने त्याला चापट मारली. त्या म्हणाल्या की शेजानला माफ करणार नाही. त्यांची मुलगी गेली असून त्या आता एकट्या आहेत.

शेजान खानवर आरोपांचा वर्षाव करताना वनिता शर्मा यांनी सांगितले की, तुनिशाच्या मृत्यूच्या वेळी त्याने तिला खोलीतून बाहेर काढले, परंतु रुग्णवाहिका बोलावली नाही. हा खून देखील असू शकतो. शीझान खानने तिला हिजाब घालण्यास भाग पाडले होते.

Exit mobile version