Download App

शरद पवारांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी? राष्ट्रवादीशी चर्चेनंतर थेट PM मोदींंनी दिली मोठी ऑफर

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा अजून एक अंक बाकी आहे का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. याचं कारण मागील काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री म्हणून अजित पवार येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांनी या चर्चांचं खंडन केलं आहे. मात्र राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या गटातील आमदारांकडून याबाबतचे संकेत मिळत आहे. अशात आता केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच ऑफर दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (Prime Minister Narendra Modi directly offered NCP President Sharad Pawar to join the Union Cabinet)

न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्य आणि केंद्रातील भाजप नेतृत्व राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी आग्रही होते. यातूनच राज्यातील भाजपच्या नेत्यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेतलं, सत्तेत स्थान दिलं. मात्र बंडानंतर आलेल्या काही सर्व्हेंनुसार राष्ट्रवादीच्या मतदारांची भावनिक साथ शरद पवार यांच्यासोबत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रातील बडे नेते शरद पवार यांनाही सोबत घेण्यासाठी आग्रही आहेत. हाच निरोप घेऊन अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे एकदा नव्हे तर दोनवेळी शरद पवार यांना भेटायला गेले होते, असं सांगितलं जातं आहे.

अध्यक्षांनी फटकरालं, अजितदादांनी झापलं, सामंतांनी समजावलं : रोहित पवारांचं उपोषण मागे

दरम्यान, या चर्चांदरम्यान, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात समील होण्याची ऑफर दिली असल्याचं न्यू इंडियन एक्सप्रेसने त्यांच्या वृत्तात म्हंटलं आहे. या वृत्तानुसार, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जागांचं सन्मानजनक वाटप आणि शरद पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात अतिमहत्वाच्या खात्यावर वर्णी लावण्याची ऑफर भाजपने दिली आहे. मात्र अद्याप पवार यांनी यावर कोणताही निर्णय घेतला नाही. पण या सर्व घडामोडींमुळेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार थांबवला आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

Uddhav Thackery यांनी ‘तेव्हा’ मार्ग काढला असता, तर ही वेळ आलीच नसती; शिंदे गटाची टीका

अजित पवार अन् प्रफुल्ल पटेल यांची शरद पवारांना गळ :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाह 9 मंत्री आणि बंडखोर नेत्यांनी 16 जुलैला शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा अजित पवारांसह सर्व नेत्यांनी आणि आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ रहावा, यासाठी मंत्र्यांनी आणि आमदारांनी शरद पवार यांना विनंती केली, असं खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं. मात्र यावेळी पवार यांना सत्तेत सोबत येण्यासाठी सर्वच नेत्यांनी गळ घातली. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी आमदारांची भाजपसोबत जाण्याची भावना असल्याचं शरद पवार यांना सांगितलं होतं, अशी माहिती उपस्थित एका आमदाराने दिली होती.

Tags

follow us