Download App

अजित पवारांकडून सिंचन घोटाळा प्रकरणी गौप्यस्फोट, पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली A टू Z कहाणी

पुन्हा मग त्याची चौकशी झाली, विधिमंडळात चर्चा झाली. या प्रकरणाची विदर्भ सिंचन महामंडळाच्या घोटाळ्याची खुली चौकशी व्हावी

  • Written By: Last Updated:

Prithviraj Chavan on Ajit Pawar Irrigation Scam Case : अजित पवार यांनी प्रचारसभेत बोलताना केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं आहे. अजित पवार उल्लेख यांनी केलेल्या सिंचनाच्या प्रकरणात 70 हजार कोटींचा घोटाळा हा शब्द मी वापरला नव्हता, माझा नाहक बळी घेतला अशी थेट प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. राज्य सहकारी बँक आणि सिंचन प्रकरणात घेतलेले निर्णय राज्याच्या हिताचे होते. (Ajit Pawar) त्याची मला शिक्षा भोगावी लागली, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

सिंचन घोटाळा काही अजित पवारांची पाठ सोडत नाही. थोडं यामध्ये स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश सिंचन खात्याला दिला होता, माझ्या कार्यकाळात मी 70 हजारांचा घोटाळा शब्द वापरला नव्हता. श्वेतपत्रिका म्हणजे चौकशी नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवारांच्या 2010-11 च्या आर्थिक पाहणी अहवालात 70 हजार कोटी रुपये गेल्या 10 वर्षांच्या खर्च झाले. सिंचनाची टक्केवारी 18.0 वरुन 18.1 झाली होती. हे अजित पवारांच्या नियोजन मंडळाच्या अहवालात नमूद केलं होतं.

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या फाइलवर आर. आर. पाटलांची सही, ती फडणवीसांनी दाखवली; अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट

मी नव्यानं मुख्यमंत्री म्हणून आलो होतो, त्यावेळी मला धक्का बसला. मी सिंचन खात्याला सांगितलं हे बरोबर आहे का, तुम्ही 70 हजार कोटी खर्च केले, जे अजित पवारांच्या अहवालात होतं. सिंचनाच्या टक्केवारी फार वाढ झालेली नाही. काय वस्तूस्थिती आहे, वस्तूस्थिती अहवाल सादर करा हे मी सिंचन खात्याला सांगितलं होतं. पुन्हा चुका होऊ नये हा त्यामागील उद्देश होता, असंही चव्हाण म्हणालेत.

माझं सरकार पाडलं

पुन्हा मग त्याची चौकशी झाली, विधिमंडळात चर्चा झाली. या प्रकरणाची विदर्भ सिंचन महामंडळाच्या घोटाळ्याची खुली चौकशी व्हावी असा अहवाल एक खालून आला, तो अहवाल गृहमंत्र्यांना सादर करण्यात आला, अँटी करप्शनकडून चौकशी करण्याचे आदेश द्या असं त्यात म्हटलं होतं. मला नंतर कळलं की गृहमंत्र्यांनी आपल्या स्तरावर ती मान्यता दिली ज्याचा उल्लेख अजित पवार यांनी केला आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

ती फाईल माझ्याकडे आली नाही, त्यावर माझी कुठली सही नाही. 70 हजार कोटींच्या सिंचन प्रकरणात मी चौकशी लावली नव्हती. नाहक माझा बळी घेतला, 2014 ला माझं सरकार पाडलं आणि भाजपच्या राजवटीची मुहूर्तमेढ केली. ही वस्तूस्थिती आहे, मी अजूनही ती फाईल बघितली नाही. ती फाईल गृहमंत्र्यांच्या स्तरावरुन मान्यता मिळून खाली गेली. गृहमंत्र्यांनी कुणाला विचारलं का? हे माहिती नाही ते आपण त्यांना विचारु शकत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

follow us