जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत घमासान सुरु असतानाच आता यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांनी केलेलं विधान चुकीचं नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अजित पवारांनी जागावाटपाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीच मोठा पक्ष असल्याचं विधान केलं होतं. त्यानंतर अजित पवार यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका-टीप्पणी केली जात होती. त्यावर आता पृथ्वीराज चव्हाण बोलले आहेत.
समीर वानखेडे प्रकरणात नाना पटोलेंनी सरसंघचालकांना ओढले…
चव्हाण म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष आहे, तर काँग्रेस दोन नंबरचा पक्ष आहे. त्यामुळे अजित पवारांनी तसे विधान करणे काहीही चुकीचे नाही. तसेच आपल्या पक्षाच्या वाढीसाठी प्रत्येक पक्षाचे नेते उत्साहवर्धक वक्तव्य करीत असतात. आजच्या महाविकास आघाडीत विधानसभेच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष असून काँग्रेस दोन नंबरचा आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे गट तीन नंबरचा आहे. त्यामुळे अशी विधान करणे काही चुकीचे नसल्याचे स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिलं आहे.
Sanjay Raut : 2024 नंतर ईडीच्या कार्यालयात कोणाला पाठवायचं, त्यांच्या याद्या तयार करणार!
तुमची ताकद जास्त असेल, तरच तुम्हाला महाविकास आघाडीत महत्त्व दिले जाईल. पूर्वी जागावाटपात काँग्रेसला जास्त जागा मिळायच्या. आम्हाला लहान भाऊ ही भूमिका घ्यावी लागायची. मात्र, आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत, असं पवार म्हणाले होते. अजित पवार कायमच आपल्या रोखठोक भूमिकेमुळे चर्चेत असतात. त्यातच त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी डीएनए टेस्ट करु असं विधान केलं होतं. तर कुणीही गर्व करु नये, असं प्रत्युत्तर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलं होतं.
Viral Video : निवेदन द्यायला आलेल्या शेतकऱ्यांकडे रोहित पवारांचं दुर्लक्ष? व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, लोकसभेच्या जागावाटपावरून सध्या महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असल्याचं दिसून येत आहे. अशातच संजय राऊतांनी लोकसभेच्या 19 जागांवर दावा केलाय. जागावाटपाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे अजित पवार, ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात चांगलेच खटके उडत असल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लोकसभेच्या 18 जागांवर दावा ठोकला आहे.
शेवगावातील दंगलीवरून शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, धर्माच्या नावावर..
याचं कारण म्हणजे 2019 साली जेव्हा शिवसेना-भाजप युतीने निवडणुका लढविल्या तेव्हा ठाकरे गटाने 18 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे आता तेच समीकरण डोळ्यासमोर ठेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडून जागांवर दावा केला जात असल्याचं बोललं जातंय.
जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ठोस स्पष्टीकरण देण्यात येत नसून निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीचं जागावाटपांचं कोडं सुटलं तरच तिन्ही पक्ष एकत्र लढू शकतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.