Download App

Puja Khedkar Case: पूजा खेडकर प्रकरणात आज निर्णय; अटक होणार की पुन्हा संरक्षण मिळणार?

याशिवाय पूजाने बोगस अपंग प्रमाणपत्र मिळवून आरक्षणाचा लाभ घेतला, असाही आरोप तिच्यावर आहे. त्यामुळे यूपीएससीने पूजावर गुन्हा

  • Written By: Last Updated:

Puja Khedkar Case Hearing Today : वादग्रस्त ठरल्यानंतर आयएएस पद गमावलेल्या पूजा खेडकरवर गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र, यापूर्वी तिने अटकेपासून संरक्षण मिळवलेलं होतं. दरम्यान, (Puja Khedkar) आज या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

यूपीएससी परीक्षा देण्यासाठी अतिरिक्त संधी मिळाव्यात यासाठी पूजा खेडकरने नावात बदल करुन शासनाची फसवणूक केली होती. त्यामुळे तिच्यावर यूपीएससीने गुन्हा दाखल करुन तिचं आयएएस पद रद्द केलं होतं. तसंच, तिने ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी आई-वडिलांपासून विभक्त राहात असल्याची कागदपत्रं बनवली होती.

याशिवाय पूजाने बोगस अपंग प्रमाणपत्र मिळवून आरक्षणाचा लाभ घेतला, असाही आरोप तिच्यावर आहे. त्यामुळे यूपीएससीने पूजावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, तिला अद्याप अटक होऊ शकलेली नाही. अटकेपासून संरक्षण मिळावं, यासाठी पूजाने कोर्टात धाव घेतलेली आहे.

आज शुक्रवारी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पूजा खेडकरविरोधात युपीएससी आणि दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळला जावा, अशी मागणी केली आहे.

पूजा खेडकरच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण होईपर्यंत दरवेळी पुढील तारखेपर्यंत तिला अटकेपासून संरक्षण मिळते आहे. त्यामुळे आज नेमकं काय होणार, याकडं लक्ष लागून राहिलं आहे. पूजा खेडकरने खोटी कागदपत्र देत अनेक वेळा परीक्षा दिल्याचा आरोप आहे.

follow us