वयाच्या 38 व्या वर्षी कमवली 11.5 कोटींची संप्पती अन् आता निवृत्तीचा विचार; पुण्यातील DINK जोडपे चर्चेत

Double Income No Kids :   पुण्यातील एका Double Income No Kids  जोडप्याने वयाच्या 38 व्या वर्षी तब्बल 11.5 कोटी रुपयांची संपत्ती जमा केल्यानंतर

Double Income No Kids

Double Income No Kids

Double Income No Kids :   पुण्यातील एका Double Income No Kids  जोडप्याने वयाच्या 38 व्या वर्षी तब्बल 11.5 कोटी रुपयांची संपत्ती जमा केल्यानंतर आता निवृत्त होण्याचा विचार करत आहे. या जोडप्याला अपत्य नाही. कामाचा वाढता ताण आणि आरोग्याच्या समस्यांमुळे येत्या दोन – तीन वर्षात निवृत्त होण्याचा विचार करत असल्याने या जोडप्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार आपल्या लाईफस्टाईल गरजांवर वर्षाला 22 लाख रुपये हे जोडपे खर्च करतो. त्यांनी त्यांची संपत्ती शेअर बाजार (Indian Stocks Market) , म्युच्युअल फंड्स, अमेरिकन शेअर्स आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवली आहे. तसेच त्यांच्याकडे काही प्रमाणात रोख रक्कम देखील आहे. त्यांनी भारतीय शेअर बाजारात आणि म्युच्युअल फंड्समध्ये 1.8 कोटी रुपये तर अमेरिकन शेअर्स बाजारात 5 कोटी आणि रिअल इस्टेटमध्ये 3.2 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर रोख रक्कम आणि निवृत्ती बचतीमध्ये त्यांच्याकडे 1.5 कोटी रुपये आहे. पुढील दोन ते तीन वर्ष काम केल्यानंतर ते निवृत्त होण्याचा विचार करत आहे.

या जोडप्याला अपत्य नसल्याने त्यांना दुसऱ्या जोडप्यांप्रमाणे मुलांचे उच्च शिक्षण, लग्न किंवा कुटुंब सांभाळण्यासाठी संबंधित इतर मोठ्या खर्चांसाठी बचत करण्याची आवश्यकता नाही मात्र तरीही त्यांचे पालक त्यांच्यावर अवलंबून असल्याने पालकांना आधार देण्यासाठी पुरेशी आर्थिक सुरक्षितता राखण्याची त्यांची इच्छा आहे. याबाबत एक्सवर अमित अरोरा या युजरने आपल्या चुलत भाऊ आणि त्यांच्या पत्नीविषयी माहिती दिली आहे. तर मनी कंट्रोलने याबाबत वृत्त दिले आहे.

आरोग्याचा विचार करत अमित अरोरा (Amit Arora) यांच्या चुलत भाऊ आणि त्यांच्या पत्नीने चाळीशीनंतर कामातून निवृत्ती घेण्याचा विचार सुरु केला आहे. नोकऱ्यांमध्ये कामाचे दीर्घ तास, सततचा ताण आणि फारसा वेळ मिळत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तामध्ये पत्नीचे मत देखील मांडण्यात आले आहे. आम्ही आमच्याची तारुण्याची वर्षे पैसा कमवण्यात घालवली. कदाचित आता त्यातील काही पैसा आमच्या स्वत:च्या आयुष्यावर खर्च करण्याची वेळ आली आहे असं मत त्यांनी मांडले आहे.

AUS vs BAN : बांग्लादेशने रचला इतिहास ; ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिला कसोटी विजय

तर दुसरीकडे अमित अरोरा यांच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 38 व्या वर्षी अशी आर्थिक स्थिती असणे ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. पण जेव्हा ते म्हातारे होतील तेव्हा त्यांच्याशी बोलायला फक्त कुत्रेच असतील असं एका युजरने लिहिले आहे. तर या प्रकरणामुळे FIRE (Financial Independence Retire Early) म्हणजेच आर्थिक स्वातंत्र्य मिळवून पारंपरिक निवृत्तीच्या वयाआधीच नोकरीतून बाहेर पडण्याच्या संकल्पनेचीही चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version