Download App

पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरण : मृत मुलांच्या पालकांना 10 लाखांची मदत, शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण आणि तरुणीच्या पालकांना विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या 10 लाखांचा धनादेश त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

मुंबई : पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण आणि तरुणीच्या पालकांना विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या 10 लाखांचा धनादेश त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरीही या प्रकरणातील दोषींवर कारवाई करणारच असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी या मुलांच्या पालकांना आशवस्त केले. (Pune Kalyani Nagar Car Accident CM Shinde Give Rs 10 Lakh Cheque To victim’s family )

 

पुण्यातील पोरशे हिट अँड रन प्रकरणात मृत्यू झालेला तरुण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी त्याना न्याय मिळवून देण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करू तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असे सांगितले होते.

तसेच मध्य प्रदेशचे रहीवाशी असूनही त्यांना झालेल्या वैयक्तिक नुकसान पाहता सहवेदना व्यक्त करण्यासाठी त्याना राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून 10 लाख रुपयांची मदत म्हणून देण्याचे जाहीर केले होते. आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मदतीचे धनादेश त्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आले. यावेळी या दोन्ही मुलांच्या पालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. तसेच आपल्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण नव्याने हाती घेत सर्व दोषींवर कारवाई केल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांचेही आभार मानले.

पुण्यात बुलडोझर पॅटर्न! अमली पदार्थमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर

19 मे रोजी पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात प्रकरणात (Porsche Car Accident) आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीला नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. अल्पवयीन मुलाची अत्या पूजा जैन यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने मान्य केली. तसेच कोर्टाने मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत.

तेव्हा पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या आशीर्वादाने ड्रग्जच्या घटना सुरु होत्या, अजित पवार गटाकडून खळबळजनक आरोप

न्यायालयाचे आदेश काय?

अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करताना न्यायालयाने बालहक्क न्यायालयाने 22 मे, 5 जून आणि 12 जून 2024 रोजी जे आदेश दिले होते ते रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे विधीसंघर्षित बालकाला तातडीने सोडावे आणि त्याचा ताबा आत्याकडे देण्यात यावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहेत अशी माहिती वकील अॅड. प्रशांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

follow us

वेब स्टोरीज