Download App

NIA Raids : मोठी बातमी! पुण्यासह राज्यात एनआयएची कारवाई; 10 दहशतवादी ताब्यात

NIA Raids: राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवाद विरोधी पथकाने राज्यात मोठी कारवाई (NIA Raids) करत अनेक संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. आज शनिवारी पहाटेपासूनच राज्यातील विविध शहरांत तपास यंत्रणांनी कारवाई (Pune News ) सुरू केली. ठाणे शहराजवळील पडगा, पुणे आणि राज्यातील अन्य शहरांत ही छापेमारी करण्यात आली. या कारवाईत इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतवादी हाती आल्याने खळबळ उडाली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे आज पहाटेपासूनच कारवाईस सुरुवात केली. या कारवाईत भिवंडीच्या पडघा गावातून सात ते आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच पुणे आणि ठाणे भागात छापेमारी सुरू ठेवण्यात आली आहे. या ताब्यात घेतलेल्या लोकांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची तयारी होती अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. या लोकांकडून बॉम्ब ब्लास्टचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

NIA : मोठी बातमी! PFI संबंधित ठिकाणांवर छापेमारी; दिल्ली, युपी, राजस्थानातही कारवाई

याआधी पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांनंतर पडघा गावावर यंत्रणांची नजर होती. त्यानंतर कारवाई करत या गावातून काही जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर खळबळ उडाली आहे. राज्य आणि देशभरातील सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून ही कारवाई महत्वाची मानली जात आहे. छापेमारी अजूनही सुरुच असल्याची माहिती आहे. त्यामुळे या कारवाईतून आणखी काय माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, एनआयएने फक्त राज्यातच नाही तर देशभरात कारवाई केली आहे. देशात वेगवेगळ्या 44 ठिकाणी एनआयनएने धाडी टाकल्याचे सांगण्यात येत आहे. देशभरात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकात एका ठिकाणी तर महाराष्ट्रात 43 ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये पुणे 1, ठाणे ग्रामीण 31, ठाणे शहर 1 आणि भाईंदरमधील एका ठिकाणाचा समावेश आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथक आणि एनआयए यांनी संयुक्तपणे ही मोठी कारवाई केली असून यातील आणखी माहिती लवकरच समोर येईल.

Tags

follow us