NIA च्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमधील खलिस्तान्यांना मदत करणाऱ्या गँगस्टर सुखदूल सिंगचा खात्मा
Gangstar Sukhdool Singh Murder In Canada : कॅनडात खलिस्तान्यांचे समर्थन करणाऱ्या आणखी एका खलिस्तानी समर्थकाची हत्या करण्यात आली आहे. सुखदूल सिंग (Gangstar Sukhdool Singh ) असे हत्या करण्यात आलेल्या गँगस्टरचे नाव असून, अज्ञातांकडून गोळ्या घालून सुकदूलची हत्या करण्यात आली आहे. सुखदुलचे नाव एनआयएच्या वाँटेड यादीत असल्याचेही सांगण्यात येत आहे. खलिस्तान्यांना मदत करत असल्याचे आरोप त्याच्यावर होते. सुखदूल हा पंजाबचा रहिवासी होता.
Women’s Reservation : भारत नाही ‘या’ देशांत महिला खासदारांचा दबदबा; राजकीय पक्षच देतात आरक्षण
याबाबत प्रकाशित वृत्तांनुसार बुधवारी रात्री झालेल्या टोळीयुद्धात मोगा जिल्ह्यातील रहिवासी देविंदर बांबिहा टोळीचा सुखदुल सिंग उर्फ सुक्खा दुनीके हा ठार झाला आहे. त्याच्यावर सुमारे 15 गोळ्या झाडण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. याआधी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचीही अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडा सरकराने केला आहे. या आरोपांनंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंदूंनो, कॅनडा सोडून भारतात जा; खलिस्तानी-दहशतवाद्याने कॅनडास्थित भारतीयांना धमकावलं
सुखदुल हा पंजाबमधील मोगा येथील रहिवासी होता. 2017 मध्ये तो पंजाबमधून पळून कॅनडाला पोहोचला. सुखदूल हा खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंगचा जवळचा मानला जात असे. 2017 मध्ये सुखदुल बनावट कागदपत्रांच्या मदतीने भारतातून कॅनडाला पळून गेला. त्याच्यावर भारतात अनेक गुन्हे दाखल असून, त्याचा नावाचा समावेश NIA च्या मोस्ट वॉन्टेड यादीत होते. NIA ने 20 सप्टेंबर रोजी अर्श डल्ला टोळीवर 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
Justin Trudeau : जस्टिन ट्रूडो अन् वाद विवाद; पंतप्रधान असतानाच घेतला होता घटस्फोट…
सुखदूल सिंग बराच काळ फरीदकोट तुरुंगात होता. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला असता बनावच पासपोर्टच्या मदतीने परदेशाच पलायन केले. सुखदुलचे नाव नांगल आंबिया हत्याकांडातही त्याचे नाव समोर आले होते. त्याने शस्त्रे आणि शूटर पुरवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. कॅनडाला गेल्यानंतर त्याने भारतात आपले नेटवर्क वाढवण्यास सुरुवात केली.
परराष्ट्र मंत्रालयाकडून अॅडव्हायझरी जाहीर…
कॅनडात होत असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jayshankar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची(Narendra Modi) भेट घेतली. या भेटीनंतर ही अॅडव्हायझरी जाहीर करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवदेनात म्हटलं की, “कॅनडातील वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि राजकीयदृष्ट्या माफ केलेले द्वेषपूर्ण गुन्हे आणि गुन्हेगारी हिंसाचार लक्षात घेता, तिथल्या सर्व भारतीय नागरिकांना आणि तिथं अंतर्गत प्रवास करु इच्छिणाऱ्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे”.
https://x.com/ANI/status/1704421807598801314?s=20