फेक आयडीवर महिनाभर चॅटिंग अन् कोयत्याने सपासप वार, पुण्यात ‘असा’ घेतला मित्राच्या खुनाचा बदला

Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून (Pune) धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. काही दिवसापूर्वी एका माजी नगरसेवकाची हत्या करण्यात

Share Market Fraud

Share Market Fraud

Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून (Pune) धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. काही दिवसापूर्वी एका माजी नगरसेवकाची हत्या करण्यात आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली होती तर आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आला आहे. ज्यामुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आज सकाळी (04 सप्टेंबर) सिंहगड रस्त्यावर एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. यामुळे सध्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सागर चव्हाण (Sagar Chavan) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्ववैमन्यासातून हा हल्ला करण्यात आला अशी माहिती सध्या समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील डहाणूकर कॉलनी परिसरात मे महिन्यात एकमेकांकडे बघितल्यावरून दोन गटात भांडण झाले होते आणि या भांडणांमध्ये एका तरुणावर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. श्रीनिवास वतसलवार असे या तरुणाचे नाव होते. श्रीनिवासवर कोयत्याने वार करणाऱ्यांमध्ये सागर चव्हाण देखील होता. आज सागर चव्हाण किरकटवाडी भागात आला होता. तेव्हा त्याच्यावर दोन तरुणांकडून कोयत्याने वार करण्यात आला. या हल्ल्यात सागर चव्हाण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या त्याची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर आली आहे.

चॅटींग आणि हत्या

माहितीनुसार, सागर चव्हाण याला मारण्यासाठी आरोपींनी काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर मुलीच्या नावाने फेक आयडी बनवली होती. या आयडीवरून सागरला अनेक मेसेज करण्यात येत होते. सागर देखील गेल्या काही दिवसांपासून मुली समजून आरोपींशी बोलत होते.

शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्यूलाच सांगितला म्हणाले, ‘ज्यांचं संख्याबळ..’

या फेक आयडीवरून आज आपण भेटू असं सागरला सांगण्यात आले होते. त्यामुळे आज सागर भेटायला आलो आणि त्याच्यावर आरोपींनी जीवघेणा हल्ला केला ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे.

Exit mobile version